बातम्या

ओझर तांबळवाडी येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील ओझर गावातील तांबळवाडी येथील हनुमान जयंती उत्सव मंडळाच्या वतीने हनुमान जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उत्सवानिमित्त मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. दिनांक २० आणि २१ एप्रिल २०२४ रोजी वाडी मर्यादित क्रिकेटचे सामने आयोजीत करण्यात आलेले होते. या स्पर्धेत यंग बाॅईज तिवरे संघ विजेता ठरला तसेच जय हनुमान तांबळवाडी उप विजेता ठरला. सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी हनुमान रायंची पालखीने राजापूर येथे गंगा दर्शनासाठी प्रस्थान केले.२३ एप्रिल रोजी सकाळी मारुती रायांचा जन्मोत्सव तसेच अभिषेक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरण संपन्न झाला त्यानंतर काकड आरत्या तदेच मंत्राच्या जयघोषात गावातील वातवण भक्तिमय झाले होते. त्यानंतर मारुती रायांची पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिमय आणि उत्साहात संपूर्ण गावातून निघाली या मिरवणुकीत मंडळांचे कार्यकर्ते तसेच महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दुपारी सत्य नारायण महापूजा संपन्न झाली आणि गावातील सर्व भविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळीं दिंडी तसेच पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात गावातील ग्रामस्थांनी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच रात्री मान्यवर सत्कार समारंभ पार पडला तद्नंतर करमणूक कार्यक्रमांतर्गत कोकणची लोककला बहुरंगी नमन नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळाने आपली कला सादर करत समस्त भाविक भक्त तसेच ग्रामस्थांचे मनोरंजन करीत कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मुंबई मधून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वाडकरी बंधू आणि भगिनीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या स्थानिक पातळीवर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अतिशय थाटात उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात संपन्न झाला त्याबद्दल मंडळांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

What's your reaction?

Related Posts

1 of 253

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!