लेख

“युवांद्वारे युवा के लिए – युवा स्वयंसेवांद्वारे ग्रामीण भारतातील दरी कमी करणे.”

मित्रहो, विजय ट्वेंटी-ट्वेंटी काही प्रमाणात अपूर्ण राहिल्यानंतर, त्याच्या त्रुटी लक्षात घेत, त्या सुधारून, स्वतंत्र भारताच्या सुवर्ण वर्षाकडे वाटचाल करत असताना, युवा भारतला देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी 12 जानेवारी रोजी म्हणजे नुकत्याच झालेल्या युवा दिनी युवांद्वारे युवा के लिए हा कानमंत्र दिला. हा मंत्र, हा मार्ग म्हणजे नेमका काय? किती गरजेचा, लाभदायी आणि सुवर्णमयी ठरणार हे युवकांच्या लक्षात आणून देण्यासाठी व त्यातील एका महत्त्वाच्या घटकावर काम करण्यासाठी, आज या विषयावर आवर्जून लिहिणं भाग पडतो, तो विषय म्हणजे “युवांद्वारे युवा के लिए” , युवा स्वयंसेवांद्वारे ग्रामीण भारतातील दरी कमी करणे.”

मित्रहो ज्या देशाकडे सर्व जग, एक अखंड भारत देश म्हणून बघतो, त्याच वेळेस याच भारत देशात विकासाच्या दृष्टीने पावलं उचलताना ग्रामीण भारतातील दरी लक्षात घेतली गेली आणि याच देशाचे भारत आणि इंडिया असे देशांतर्गतच दोन तुकडे करण्यात आले. परिणामी ग्रामीण भारतातील युवक, जनता ही इंडियाकडे आकर्षित झाली आणि ग्रामीण भारतातील दरी ही कमी होण्याऐवजी विस्तारित होत गेली.
हीच दरी आज भारताला विकसनशील ते विकसित बनवायच्या मार्गातील एक मोठी बाधा ठरू लागली त्यावेळेस ही दरी कमी करण्यासाठी देशातील युवकाची भूमिका महत्वाची ठरू लागते.

मित्रहो, ग्रामीण भागातील दरीचा विचार शैक्षणिक दृष्ट्या करतो तेव्हा ग्रामीण भागातील बंद पडलेल्या शाळा आणि खालावलेला शैक्षणिक दर्जा अगदी प्रखर्षाने समोर येतो. पण उच्च शिक्षणासाठी गेलेला गावातील युवक सुद्धा शहराच्या मोहात पडून, ग्रामीण भागात शिकवायला यायला तयार होत नाही त्यावेळेस ग्रामीण भारतातील दरी ही अधिकाधिक वाढू लागते. म्हणून आज जर शैक्षणिक दृष्ट्या ही दरी कमी करून विकास घडवायचा असेल तर युवकांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याची आणि असलेल्या शाळा – कॉलेजेस मध्ये दर्जाचे शिक्षण देऊन, नवा भारत घडवायला पुढे येणे गरजेचे आहे.

ग्रामीण भारतातील दरी वाढवणारा मुख्य मुद्दा म्हणजेच रोजगाराचा विषय येतो , त्यावेळेस नोकरीसाठी शहराकडे जाणाऱ्या युवा जनतेला हे लक्षात आणून देणं महत्वाचं वाटतं की ज्या नोकरी साठी आज आपण शहराकडे धाव घेतो, त्याच नोकऱ्या इतरांना देणारे फूड इंडस्ट्री पासून ते technological idustry पर्यंत चे उद्योग आज ग्रामीण भागात सुरू करण्याचा पर्याय देखील आपल्या हाती आहे. पण अनेकांना व्यवसाय सुरू करताना प्रश्न पडतो तो म्हणजे आर्थिक मदतीचा, पण मित्रहो, मुद्रा लोन सारख्या सरकारी स्कीम चा फायदा आज ग्रामीण भागात अनेक युवकांनी घेतला आहे, तर अशा युवकांनी सोबतच्या इतर युवकांना अशा स्कीम व संधी बद्दल माहिती देऊन मदत केली तरच यूवांद्वारे युवांसाठी ही संकल्पना सत्यात उतरेल. ज्यावेळेस युवक हे ग्रामीण भागाला नवं संधी आणि नवं भारताची पायरी म्हणून बघेल त्याच वेळेस शहरातील नोकरी द्वारे मिळणाऱ्या रोजगाराचा टक्का आणि ग्रामीण भागातून मिळणाऱ्या रोजगाराचा टक्का हा समांतर बनून ही दरी कायमची मिटली जाईल.

आज ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकारद्वारे शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक, शिवाय मूलभूत गरजांची सुद्धा मदत पोहोचवली जाते. परंतु तरीही ग्रामीण भारताचा विकास पाहिजे त्या प्रमाणात आजही का नाही? यासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह ठेवून मी अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं,
की काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ग्रामीण भागातील एक महिला असं म्हणते की आमच्या गावातील सत्तर जणांचे संडास आमच्या सरपंचाने खाल्ले. खरंतर वाक्याचा अर्थ शब्दशः घ्यायला गेलं तर थोडा घाणेरडा अन् गमतीदार आहे. पण ग्रामीण भारताची दरी आजही कायम असण्याचं उत्तर याच वाक्यात लपलेल आहे. कागदोपत्री हागणदारी मुक्त आणि स्वच्छ दिसणारा हाच देश, याच ग्रामीण भारताच्या दरीत भ्रष्टाचारामुळे गुदमरताना दिसतो, त्यावेळेस ही दरी जास्त विस्तृत बनलेली भासते.
अशा वेळेस एक जाणकार आणि स्वयं सेवी सुशिक्षित युवक म्हणून ग्रामीण राजकारणात उडी घेऊन, भले खुर्ची नसली तरी विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
सरकारी स्कीम, निधी आणि त्याचा केलेला वापर यावर एक युवक लक्ष ठेवेल, गरज पडल्यास माहितीच्या अधिकार सारखे अधिकार वापरून आढावे घेऊन सरकारी योजना आमलात आण्यासाठी प्रयत्न करेल आणि ग्रामीण भागात आरोग्य,सांस्कृतिक, शैक्षणीक, आणि व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रात सरकारच्या मदतीने एक क्रांती घडवून आणेल, तेव्हाच ग्रामीण भागातील दरी कमी होऊन, 2047 पर्यंत युवांद्वारा युवा के लिये हे मोदींचं स्वप्न पूर्ण होईल

खरंतर प्रत्येक युवकाला/ नागरिकाला या साऱ्या गोष्टी प्रत्येकी समजाऊन देणे शक्य नाही. म्हणून ग्रामीण भागात देखील पथनाट्य, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम या मधून युवकांनी युवकांचे मार्गदर्शन करणे, त्यांना विकासाचा मार्ग दाखवणे अपेक्षित आहे. तेव्हाच मोदीजिंनी दिलेल्या, युवा द्वारे युवा के लिये, या संकल्पनेतून ग्रामीण भारतातील दरी कमी होऊन , देश 2047 पर्यंत विश्र्वगुरू बनून जगाचं नेतृत्व करत असेल. *✒️हर्ष सुरेंद्र नागवेकर*

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!