बातम्या

लांजा तालुक्यातील खानवली गावात भाजपाला अच्छे दिन; शेकडो उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

लांजा : लांजा राजापूर मतदार संघामध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीची ताकद वाढताना दिसत आहे. लोकसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीला तळ कोकणात पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लांजा तालुक्यातील खानवली गावात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशासाठी चंद्रकांत मांडवकर अनंत चौगुले, वाघोजी खानविलकर, जयेश बंडवे यांनी विशेष मेहनत घेतली. खानवली गावामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशांमध्ये पुरुषांबरोबर महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश कालकर, सुनील मांडवकर, प्रदीप मांडवकर, संतोष मांडवकर, सुरेश मांडवकर, विजय मांडवकर, अशोक बंडबे, चंद्रकांत मांडवकर, प्रवीण मांडवकर, दत्ताराम मांडवकर, पंढरीनाथ कालकर, रमेश मांडवकर, अविनाश बंडगे, दीपक बनवे, साहिल कालकर, प्रतीक मांडवकर, दिनेश मांडवकर, राजाराम कालकर, दिनेश कालकर, विश्वास कालकर, संजय मांडवकर, शंकर मांडवकर, दत्ताराम मांडवकर साईराज कालकर, रामचंद्र कालकर, शांताराम मांडवकर, विनोद मांडवकर, महादेव मांडवकर, विजय कालकर, योगेश कालकर, शिवाजी बंडबे, संजय काळकर आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
पक्ष प्रवेशाच्या वेळी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री राजेशजी सावंत साहेब, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुन्ना शेठ खामकर तालुक्याचे सरचिटणीस विराज हरमळे, शैलेश खामकर, युवा अध्यक्ष अजय गुरव, कोटगाव चे उपसरपंच रवींद्र नारकर, भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष अनंत खरात श्री पाटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहिरात..

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!