बातम्या

अंधेरी चांदिवली येथील संघर्ष नगर येथे सादर होणार लेखक अमोल मांडवकर लिखित “स्मृती गंध” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग…

मुंबई :- (प्रमोद तरळ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळया निमित्त संकल्प सिद्धी संघ (रजि.) संकुल क्र.११ संघर्ष नगर आयोजित नाट्यदीप कलामंच मुंबई निर्मित दोन अंकी नाटक “स्मृती गंध” गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता संघर्ष नगर चांदिवली येथे सादर होणार आहे. नात्यात गुंतलेल्या ना ‘त्याची गोष्ट’ स्मृती गंध नाटकाचे लेखक अमोल मांडवकर दिग्दर्शक अनिल मांजरेकर सूत्रधार दीपक मांजरेकर प्रकाशक चंद्रकांत गोताड नेपथ्य अशोक पालेकर संगीत कल्पेश सोलकर कविता लेखन गणेश भस्मे अनुपमा मुंजे प्रकाश योजना सुयोग बारगोडे कलाकार विजयेंद्र मांडवकर, मंगेश काताळे, अजय मांजरेकर, स्वप्नील घाणेकर,दीपक जाधव, अमोल मांडवकर, अनिल मांजरेकर आणि श्वेताली अडसूळ . या प्रयोगासाठी संकल्प सिद्धी संघांचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि शिवप्रेमी, श्री जनार्दन गोवळकर आणि श्री माऊली एंटरटेनमेंट मुंबई यांनी सहकार्य लाभले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 254

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!