बातम्या

राजापूर शहराला पांगरे धरणातून पाणीपुरवठा करा : सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांची मागणी

राजापूर :- (प्रमोद तरळ) तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सुध्दा मार्च महिन्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे एकदिवस आड करुन होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका राजापुर शहरवासीयां बरोबर शासकीय कार्यालये तसेच ग्रामीण रुग्णालयाला बसत आहे राजापूर शहराला टंचाई मुक्त करायचे असेल तर शहरालगत असलेल्या पांगरे धरणातून पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी कोंढेतडचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी केली आहे.
सध्या राजापूर शहराला शीळ जॅकवेल व कोदवलीच्या सायबाच्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो कोदवली धरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे हे धरण मार्च मध्येच आटत असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते प्रशासनाने तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असलेल्या पांगरे धरणातून पाणीपुरवठा केल्यास शहर टंचाईमुक्त होईल असा विश्वास श्री लांजेकर यांनी व्यक्त केला आहे
               तसेच या धरणातून तीन वर्षांपासून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून यालगत असणाऱ्या १४ गावांसाठी २४ कोटी रुपयांची घरोघरी नळ पाणी योजना राबवली जात आहे.व ती प्रगतीपथावर आहे . ताम्हणे, पांगरे उन्हाळे अगदी शहरालगत असणारे,कोंढेतड या गावापर्यंत या योजनेचे काम चालू आहे, जर पांगरे धरणातून राजापूर शहरासाठी नळपाणी योजना राबवली तर शहरांतील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होऊ शकेल.
लोकप्रतिनिधीनी तसेच प्रशासनाने मुबलक पाणीसाठा असलेल्या पांगरे धरणातून पाणीपुरवठा योजना राबविल्यास राजापूर शहरवासीयांना पाणी उपलब्ध होऊ शकेल म्हणूनच प्रचंड पाणीसाठा असलेळल्या पांगरे धरणावरुन‌ शहरवासियांसाठी पाणीपुरवठयासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे जनतेचेही असेच मत असल्याचे श्री अरविंद लांजेकर यांनी म्हटले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!