बातम्या

प्रमोद तरळ यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर.

मुंबई:- (प्रतिनिधी) दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे औचित्य साधून आर्यारवी एंटरटेनमेंट (ARYARAVI ENTERTAINMENT)प्रोडक्शनतर्फे
मुंबईत वास्तव्यास असलेले राजापूर तालुक्यातील तिवरे गावचे सुपुत्र, पत्रकार प्रमोद तरळ यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी सायं. ठिक ६ वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव दादर पूर्व येथे संपन्न होणार आहे
सदर सोहळ्याला प्रा. श्री विसुभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात फेम), अरुण म्हात्रे (जेष्ठ कवी), विजय पाटकर (सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते), डॉ किशोर खुशाले (एम बी बी एस, एम एस प्रसिद्ध वादक,अभिनेते), दिलीप दळवी (सरचिटणीस फिल्म क्राफ्ट फेडरेशन), सौ गीता कुडाळकर (अभिनेत्री), अनिल सुतार (प्रसिद्ध नॄत्य दिग्दर्शक, अभिनेता), खलील शिरगावकर (उद्योजक, अभिनेता आणि समाजसेवक), अजित शाह (प्रोप्रायर फेअर ऍग्रो, समाजसेवक), राजेंद्र घरत (उपसंपादक दै. आपलं नवं शहर), गुरुनाथ तिरपणकर (अध्यक्ष – जनजागृती सेवा संस्था (रजि), एन डी खान (संस्थापक लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत श्री प्रमोद तरळ हे गेली २४ वर्षे पत्रकारिता, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात

What's your reaction?

Related Posts

1 of 254

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!