बातम्या

खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्विय सहायक श्री. आदिनाथ कपाळे हे “प्रमुख पाहुणे” म्हणून उपस्थित.

.
प्रतिनिधी : प्रथमेश बोडेकर

खारेपाटण येथील शेठ न म विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला .या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहायक श्री आदिनाथजी कपाळे हे वार्षिक शैक्षणिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खारेपाटण पंचक्रोशी शैक्षणिक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा श्री प्रवीणजी लोकरे यांनी भूषविले .याप्रसंगी व्यासपीठावर शेठ न म विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री संजय सानप सिनियर कॉलेज चे प्राचार्य ए डी कांबळे , विद्यालयाचे पर्यवेक्षक राऊत ,प्राथमिक विभागाच्या मुख्याद्यापीका सौ वृषाली दरपे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते .अध्यक्षांच्या हस्ते मान्यवरांना शालश्रीपळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला ..मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपण पुढील शिक्षण याच शाळेत घेणार असल्याचे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात आले .मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ..प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा आदिनाथजी कपाळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शुभेच्छा देताना या विद्यालयाचा विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करून सुयश प्राप्त करेल आणि विद्यालयाचे नाव मोठे करेल असा आशावाद व्यक्त केला आणि प्राथमिक विभागाच्या स्टाफचेही कौतुक केले .अध्यक्षीय भाषणात प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राथमिक विभाग अनुदानित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली .आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शर्मिन काझी आणि आभार प्रदर्शन सौ अंकिता सावंत यांनी केले..

दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!