बातम्या

अडीच वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती…

न्यायालयाच्या दणक्याने DG कार्यालय हादरले

प्रतिनिधी : पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात योग्य समन्वयाचा अभाव असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नतीच्या कक्षेत असूनही सहायक पोलीस निरीक्षकांना वंचित रहावे लागले . मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावल्यामुळे त्यांना पदोन्नती देण्याची तयारी करण्यात आली .
राज्य पोलीस दलातील 103 क्रमांकाच्या तुकडीतील सहायक पोलीस निरीक्षक गेल्या अडीच वर्षांपासून पदोन्नती पासून वंचित राहिले होते .त्याचा फटका तब्बल 600 पोलीस अधिकाऱ्यांना बसला होता .103 क्रमांकाच्या तुकडीतील 440 सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीसाठी महासंचालक कार्यालयाकडून मंगळवारी सायंकाळी महसूल संवर्गाची यादी प्रकाशित करण्यात आली .तसेच 25 एप्रिल पर्यंत बंधपत्र भरून सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे .निवडणूक काळातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांची स्थिती लक्षात घेता लवकरात लवकर पदोन्नती देण्याच्या तयारीत महासंचालक कार्यालय आहे त्यामुळे बंधपत्र आणि महसूल संवर्गाचा विषय दोन दिवसात मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे .मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे .

दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!