बातम्या

दुर्घटनाग्रस्त ईशाळवाडीला पोहोचली जोगेश्वरीतून जिवनावश्यक वस्तूंची मदत…..

जोगेश्वरी – (प्रमोद तरळ) पूर्व येथील पिंपलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सीतानगर यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दुर्घटना ग्रस्त इर्शाळ वाडीतील लोकांना अत्यावश्यक असे किराणा सामान व नवीन कपडे देऊन सहकार्य करण्यात आले..
. या ‌मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश शेटये, समीर गुरव, अनिकेत मोऱ्ये, गणेश तेली, प्रदीप दर्पे, गौरव नेमसे, जितेश जगताप आदिनी स्वतः तिथे जाऊन गावकऱ्यांना सामान वितरीत केले व त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा छोटासा प्रयत्न केला. जोगेश्वरीतील ज्या ज्या लोकांनी या कार्यसाठी सहकार्य केले त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले..यापुढेही आम्हाला जे जे शक्य आहे त ते चांगले करण्याचा मानस असल्याचे मंडळाचे हितचिंतक ज्ञानेश्वर परब यांनी सांगितले. दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 254

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!