बातम्या

वाटूळ कडून राजापूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरुन दुहेरी वाहतूक, प्रवाशांच्या जीवाला धोका.. ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा.

राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या वाटूळगाव ते राजापूरकडे जाणारा रस्ता अर्धवट स्थितीत असल्याने एकाच बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरु दुहेरी वाहतूक सुरू आहे वारंवार निवेदने देऊन सुद्धा सर्व्हिस रोडचा प्रश्न निकाली न लागल्याने वाटूळ ग्रामस्थांनी येत्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे त्याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दिले आहे
महामार्गालगतच पाचवी ते बारावी पर्यंत शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थी येथून ये-जा करत असतात रस्त्याच्या एकाच बाजूने गाड्यांची रहदारी असल्याने वॄध्द, गरोदर स्त्रिया यांना रस्ता ओलांडणे अवघड होते येथे रस्त्यालगत रविवारचा आठवडा बाजार भरत असल्याने किरकोळ अपघाताचे प्रकार नेहमीच घडत असतात यापूर्वीही या रस्त्याची निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही दुर्लक्ष करण्यात आले या कामाची दखल घेतली जात नसल्याने शिव प्रतिष्ठान संस्थापक प्रशांत बाजीराव चव्हाण व वाटूळचे समाजसेवक बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकसभा व अन्य निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे
तसे निवेदनही जिल्हाधिकारी यांच्यासह राजापूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना टपाल द्वारा दिले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!