बातम्या

सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, राजापूर तर्फे दि. ८ ते ११ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन….

राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील ओणी येथील सुप्रभा वाचनालय, कोंडिवळे, सुप्रभा पतसंस्था, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ आदी संस्थांची आधारवड बनलेली सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था ही १९८० स्थापन झाली आहे या संस्थेच्या वतीने दि. ८ मे ते ११ मे २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
बुधवार दि ८ व गुरुवार दि. ९ मे रोजी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा, शनिवार दि ११ मे २०२४ रोजी स. ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दु. ३.३० हळदीकुंकू समारंभ, रात्री ८.३० माहेरवाशिणी व मान्यवरांचा सन्मान सोहळा, रात्री ‌९ वा. जिल्हास्तरीय सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत सदर कार्यक्रम कै. बाबू गोविंद तुळसणकर सभागृह,कोंडिवळे कासारवाडी येथे संपन्न होणार आहेत
सोलो व ग्रुप डान्स स्पर्धेतील सहभागासाठी सुनील जाधव – ८९८३०६५०७८, विनोद मिरगुले – ८६६८८१०१७७, गणपत भारती – ८८७९६९०००४ तर क्रिकेट स्पर्धेतील नोंदणीसाठी अक्षय जानस्कर – ९०८२७६३९९५, प्रसाद मयेकर – ९०२८७७२९१९, गणपत भारती – ८८७९६९०००४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!