बातम्या

महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या (MCOA) वतीने महाराष्ट्राच्या कोचिंग क्लासेसच्या हक्कांसाठी एकता मेळाव्याचे आयोजन.

मुंबई:- (प्रमोद तरळ) महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच्या (MCOA) वतीने २० एप्रिल रोजी, योगी सभागृह दादर मुंबई येथे क्लास चालक एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास कोचिंग क्लासेस नियमन विधेयकासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील क्लास चालक एकत्र आले होते.
शिखर परिषदेच्या केंद्रस्थानी दोन महत्त्वाच्या चर्चा होत्या. सर्वप्रथम एम.सी.ओ.ए. ने प्रस्तावित नियमन विधेयकाला प्रखर विरोध करून, क्लास चालक, पालक आणि विद्यार्थी यांसारख्या प्रमुख भागधारकांशी सर्वसमावेशक सल्लामसलत करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. दुसरे म्हणजे, आर्टिफिशियल इंन्टिलीजन्स कार्यशाळेने अध्यापन पद्धतींमध्ये ए. आय. परिवर्तनीय क्षमतेवर प्रकाश टाकला.
दि. १६ जानेवारी २०२४ रोजी केंद्र सरकारने देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून राज्यांना कोचिंग क्लासेसचे नियमन करण्याचे आवाहन केले. या बाबत क्लास मालक संघटनांनी विद्यार्थी वयोमर्यादा, जागा, शुल्क आणि वेळापत्रक इत्यादी बाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रशासनाकडून आज पर्यंत काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
२००० हून अधिक क्लास चालकांच्या उपस्थितीत, शासनाच्या अस्पष्ट भूमिके विरुद्ध एकसंघ आवाज म्हणून काम करण्याचे फेडरेशनने ठरविले आहे. आज महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस सुमारे ५,००००० लोकांना रोजगार देतात. तसेच शिक्षण, महसूल आणि रोजगार निर्मिती या मध्ये कोचिंग क्लासेसचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख कोचिंग क्लास संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए), कोचिंग इन्स्टिट्यूट (एसीआय), कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन (सीसीटीएफ), कोचिंग क्लास प्रोप्रायटर्स असोसिएशन (सीसीपीए), कोचिंग क्लास असोसिएशन (सीसीए), कोचिंग क्लास वेल्फेअर असोसिएशन (सीसीडब्ल्यूए), असोसिएशन ऑफ कोचिंग क्लासचे मालक आणि मार्गदर्शक (एसीसीओम), महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेसच्या हक्कांसाठी ते खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याने त्यांना क्लास चालकांचे सक्रिय समर्थन लाभले.
एमसीओएने विद्यार्थी आणि पालकांना लाभदायक मार्गदर्शक तत्त्वांसाठी सातत्याने समर्थन केले आहे, तथापि, कोचिंग क्लासेसचे नियमन विधेयक तयार करताना क्लास संचालकांच्या संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांशी सल्लामसलत करावे एवढीच माफक अपेक्षा आहे.
दि. ३ एप्रिल २०२४ रोजी एका ऐतिहासिक निर्णयात माननीय न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांनी नियामक फ्रेमवर्क तयार करताना क्लास चालक संघटनांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून कोणत्याही नियमांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी क्लास चालक संघटनांशी संवाद साधण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
या बाबत अनिश्चितता वाढत असून प्रशासनाने या महत्त्वाच्या समस्या मान्य करून रचनात्मक चर्चा करणे अत्यावश्यक आहे. कोचिंग क्लास उद्योगासाठी सर्वसमावेशक नियामक फ्रेमवर्क सुनिश्चित करून, सर्व संबंधितांना विश्वासात घेवून मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत असे
श्री प्रजेश ट्रोटस्की
अध्यक्ष,
महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन, (MCOA) यांनी म्हटले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!