बातम्या

‘मंथन प्रज्ञाशोध’ परीक्षेत केंद्र शाळा दाभोळेचे तीन विद्यार्थी चमकले.


संगमेश्वर – (प्रमोद तरळ) सन २०२३-२०२४ मध्ये ‘राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून संगमेश्वर तालुक्यातील केंद्र शाळा दाभोळे नं. २ मधील तीन विद्यार्थी चमकले आहेत.
शाळेत मंथन अरूण पाटील हा विद्यार्थी इयत्ता. सहावीमध्ये राज्यात १४ वा, कोकण विभागात ३ रा, व रत्नागिरी जिल्हात २ रा आला आहे.
सार्थक करंबेळे हा विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये राज्यात २७ वा आला आहे. तसेच मृदुल अरूण पाटील हा इयत्ता दुसरीमध्ये राज्यात १४ वा व कोकण विभागात ९ वा आला आहे.
‌. ग्रामीण भागात प्राथमिक शाळा आणि या शाळेतील विद्यार्थी आपली गुणवत्ता अशा परीक्षांमधून वेळोवेळी दाखवतात. ग्रामीण भागातील शिक्षण घेणारी ही मुले आणि त्यांचे आई वडील हे प्रतिकूल परिस्थितीत आपले या मुलांना शिकवत आहेत. आणि त्या आई वडिलांच्या या कष्टाचे मोल जाणून असे विद्यार्थी यश संपादन करत आहेत.तरी या मुलांना आपल्या आई वडिलांबरोबर शाळांमधील शिक्षकवर्गाचे खूप मोलाचे मार्गदर्शन असते.
तरी सदर विद्यार्थ्यांना सौ.वारके मॅडम सौ.सुवर्णा मोघे मॅडम व केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरूण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दाभोळे गावाचे सरपंच सन्मा.श्री.राजेश रेवाळे तसेच उपसरपंच श्री.किरण दाभोळकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संजय बेलकर, शिक्षणतज्ज्ञ श्री.दिलीप मालप, श्री.पंकज कांबळे सर यांनी अभिनंदन केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 253

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!