बातम्या

चुनाकोळवण नं १ शाळेचे मुख्याध्यापक श्री वासुदेव राऊत व शिक्षक गंगाराम कांबळे यांचा सेवापूर्ती सदिच्छा कार्यक्रम उत्साहात साजरा …

राजापूर:- (प्रमोद तरळ) बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी पुर्ण प्राथमिक शाळा चुनाकोळवण नं-१ मुख्याध्यापक मा. श्री. वासुदेव ध.राऊत व पदवीधर शिक्षक श्री.गंगाराम य. कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा पु. प्रा. शाळा चुनाकोळवण नं-१ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून चुनाकोळवणचे सुपूत्र व पु. प्रा. शाळा शिवणे मुख्याध्यापक सन्मा. श्री प्रकाश बाईत हे लाभले होते. नियोजित कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता सुरू करण्यात आला. प्रथम कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांचे ओळख करून देत स्वागत करण्यात आले. त्यानंतर सेवापुर्ती सोहळ्याचा महत्वपूर्ण कार्यभाग म्हणजे दोन्ही सत्कार मुर्तींचा सहपत्नीक हृद्यस्पर्शी सत्कार सोहळा आयोजकांच्या वतीने व ग्रामविकास समीती चुनाकोळवण मुंबई ग्रामीण यांच्यावतीने सन्मान चिन्ह, शाळा श्रीफल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ईतर पालक वर्ग ,इतर उपस्थित अनेक मान्यवरांनी व्यक्तीगत सुध्दा दोन्ही दाम्पत्यानचा सहपत्नीक सत्कार करत त्यांना सेवा निवृती नंतरच्या भविष्यासाठी खूप साऱ्या सदिच्छा दिल्या.‍
कार्यक्रमाला गावप्रमुख श्री तुळाजी बा मटकर ग्रामविकास समितीचे माजी सचिव श्री रविंद्र मटकर माजी केंद्रीय प्रमुख पांगरीकर सर, सरपंच श्री.श्रीकांत मटकर, ग्रामसेवक सोबन साहेब, पोलीस पाटील – संजय पाटणकर तं.मु.अध्यक्ष – सुरेश गुरव चुनाकोळवण, गुरूदेव सर, श्री.विनायक मटकर (गुरूजी), श्री जयवंत भारती (गुरूजी) सौ. पांगरीकर मंँडम सौ. तांबे मँडम, संतोष शेडेकर, पालक वर्ग , ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामविकास समिती चुनाकोळवण मुंबई ग्रामीण याना देण्यात आलेल्या निमंत्रणाचा मान राखत ग्रामविकास समीती चुनाकोळवण ग्रामीणचे श्री यशवंत गोपाळ मटकर, शंकर बाईत, महेन्द्र भेरे, लक्ष्मण भेरे, मुकादम श्री राम भेरे, चंद्रकांत कोतावडेकर, सुरेश शिंदे, ग्रामविकास समीती चुनाकोळवण मुंबई ग्रामीण च्या महीला समीती सौ. अनीता मटकर सौ जया भेरे त्याच बरोबर अनेक महिला उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाच्या वेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली . त्यामध्ये सौं रसिका दिलीप मटकर, सौं. योगिनी पाटणकर, संजय पाटणकर, सौं. प्रतिक्षा पाटणकर, सौं अनिता मटकर, विद्या बावकर, जयवंती पळसमकर स्मीता साखळकर मॅडम, गोरुले गुरुजी, विनायक मटकर, सारुक्ते गुरुजी, पांगरीकर सर व मॅडम, भरती गुरुजी त्याच बरोबर ‌श्री रविंद्र मटकर इत्यादी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.
शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्ग यांच्या वतीने ग्रामविकास समिती चुनाकोळवण संघटनेचे विशेष आभार मानण्यात आले अतिशय सुंदर वातावरनात हा कार्यक्रम पार पडला ,तेवढेच सुंदर नियोजन शाळा व्यवस्थापन समिती चुनाकोळवण,पालक वर्ग ,शाळा चुनाकोळवण न. १ यांच्या वतीने करण्यात आले होते,
गुरुवर्याच्या सेवापुर्ती कार्यक्रमाला ग्रामविकास समिती संघटनेच्या विनंतीला मान देऊन मुंबई ते गाव असा प्रवास करत आपला अमुल्य वेळ काढून तत्परतेने उपस्थित राहिलेले समितीचे माजी मुख्य सचिव आणि विद्यमान सल्लागार श्री.रविंद्र मटकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ, मान्यवर,शिक्षक वर्ग यांचे समितीच्या वतीने आभार आले. सादर कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती चुनाकोळवण, पालक वर्ग शाळा चुनाकोळवण न. १
समस्त ग्रामस्थ गाव – चुनाकोळवण मुंबई / ग्रामिण व शिक्षक वर्ग यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य श्री .बाईत गुरुजी, विनायक मटकर (गुरूजी) संजय पाटणकर (पोलीस पाटील ) यांचे लाभले. सादर कार्यक्रमाचे सूत्र संचालक -श्री . सारूक्ते गुरुजी , श्री- सुर्यकांत गोरुले (गुरुजी ) यांनी केले.
शेवटी अध्यक्षाचा भाषणाने शेवट करत आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

What's your reaction?

Related Posts

1 of 253

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!