बातम्या

द्वितीय वर्धापनदिनानिमित्त कल्पना कॉलेज लांजा तर्फे राखी मेकिंग कार्यशाळा..

लांजा : कल्पना असोसिएशन ऑफ सोशल अँड एज्युकेशन संचलित कल्पना कॉलेज चा द्वितीय वर्धापन २७ ऑगस्ट रोजी साजरा होत असताना सामाजिक उपक्रमाने या याची सुरुवात करण्यात आली.
शनिवार दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी लांजा शहरातील जानकीबाई तेंडूलकर महिला आश्रम येथील विद्यार्थिनींना व महिलांसाठी राखी बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर कल्पना कॉलेज च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. महिला सबलीकरण व स्वावलंबनासाठी असे उपक्रम छोटे जरी वाटत असले तरी यामध्ये मुलींना एक वेगळं कौशल्य शिकता यावं या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उपस्थित सर्व विद्यार्थिनींनी व महिलांनी या मध्ये उत्स्फूर्तपणे पणे सहभाग नोंदवला व राखी बनविणे शिकून घेतले.
यावेळी मुख्य प्रशिक्षक म्हणून कल्पना कॉलेज फॅशन डिझायनिंग विभागाच्या प्रा. तेजस्वी मोरे मॅडम, व सहकारी विद्यार्थीनी कु. रुमान अझीझी, कु. मीनल राजपूत, कु. श्रावणी बांदकर, कु. कल्पना कोळेकर यांनी उत्तम भूमिका बजावली.
या प्रसंगी महिला आश्रम लांजा च्या संचालिका मा. बेलवलकर मॅडम अधिक्षिका सौ. कांबळे मॅडम व कल्पना असोसिएशनचे संस्थापक मा.प्रा. मंगेश चव्हाण सर उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 225

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!