बातम्या

लीलाधर भडकमकर यांचा दक्षिण रत्नागिरी दौरा संपन्न.

भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि कोकण विभाग संयोजक लीलाधर भडकमकर यांचा दक्षिण रत्नागिरी जिल्हा नुकताच पार पडला. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना बांधणी आणि प्रस्तावित कार्यक्रमांबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. लीलाधर भडकमकर यांचा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी शहर, संगमेश्वर उत्तर आणि संगमेश्वर दक्षिण मंडलांचा दौरा गत आठवड्यात पार पडला होता. गुरुवार दि.२६ रोजी लांजा, पूर्व राजापूर आणि पश्चिम राजापूर या मंडलांच्या दौऱ्याने उर्वरित दौरा कार्यक्रम संपन्न झाला.

लांजा मंडलाची बैठक लांजा येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी राजापूर-लांजा विधानसभा क्षेत्रप्रमुख श्रीम. उल्का विश्वासराव, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा परिणिता सावंत उपस्थित होत्या. कामगार मोर्चाची लांजा तालुका कार्यकारिणी तयार करणे, कामगार योजना आणि अधिकारांबद्दल जागृती निर्माण करणे, मन की बात कार्यक्रम आयोजित करून तेथे जनजागृती करणे याबाबत नियोजन झाले. पुढील बैठका भांबेड, साटवली, दाभोळे, रिंगणे येथे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. राजापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मंडलांची एकत्रित बैठक राजापूर शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर सुतार (पूर्व), सुरेश गुरव (पश्चिम), तालुका सरचिटणीस हरिश्चंद्र शिवगण (पूर्व), उमाशंकर दाते (पश्चिम), युवा मोर्चा तालुकाध्यक्ष समीर शिंदे (पूर्व), अरविंद लांजेकर (पश्चिम), प्रकाश भिवंदे, संदेश विचारे उपस्थित होते. दोन्ही मंडलांच्या कार्यकारिणीच्या प्रस्तावित नावांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

लांजा आणि राजापूर दौऱ्यादरम्यान लीलाधर भडकमकर यांच्यासह कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष बोरकर, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर आणि जिल्हा उपाध्यक्ष अमर कीर उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 225

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!