महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुखने याही वर्षी १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतून प्रविष्ट झालेल्या दोन्ही परीक्षेतील ९२ विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. प्रशालेतून इंटरमिजिएट परीक्षेला ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, यामधून १४ विद्यार्थ्यांना अ श्रेणी, २९ विद्यार्थ्यांना ब श्रेणी आणि १७ विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली आहे. तर एलिमेंटरी परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या ३२ विद्यार्थ्यांमधून ३ विद्यार्थ्यांना अ श्रेणी, ३ विद्यार्थ्यांना ब श्रेणी, तर २६ विद्यार्थ्यांना क श्रेणी प्राप्त झाली आहे. प्रशालेचे कलाशिक्षक श्री. सुरज मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हे यश प्राप्त केले आहे. शासकीय रेखाकला परीक्षेच्या आधारे प्रशालेचे अनेक विद्यार्थी आर्किटेक्चर, इंजिनीयर, कॉम्प्युटर डिझायनर व ॲनिमेटर, विविध कला प्रकारांमध्ये नोकरी व व्यवसाय करत असून, आज अनेक विद्यार्थी याबाबतचे शिक्षणही घेत आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षक श्री. सुरज मोहिते यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून सर्वांना भविष्याची शुभेच्छा दिल्या.
फोटो- शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेले पाध्ये प्रशालेचे विद्यार्थी.
छाया- सुरज मोहिते.