ओंकार मांजरेकर वाडी प्रथम तर जय विमलेश्वर देऊळ वठारने पटकावला द्वितीय क्रमांक….
.
राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्याचे आकर्षण ठरलेल्या ओणी विभागाच्या मनसे चषक २०२४ क्रिकेट स्पर्धा क्रिकेट संघ व क्रिकेट रसिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दि. ३ फेब्रुवारी २०२४ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली…
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक मान ओंकार मांजरेवाडी तर
द्वितीय पारितोषिक
जय विमलेश्वर देऊळ वठार
यांनी पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना रत्नागिरी संपर्क अध्यक्ष मनीषजी पाथरे, राजापुर संपर्क अध्यक्ष दत्ताजी दिवाळे, तुषार समजिस्कर सहसंपर्क अध्यक्ष कोदवली विभाग, यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले .प्रथम क्रमांक रोख रक्कम आणि ट्रॉफी राजापुर संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे साहेब यांनी दिली होती
सर्व विजेत्यांचे व भाग घेतलेल्या सर्व टीमचे आणि उपस्थित मान्यवरांचे, आयोजक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
ओणी आणि जय हनुमान मित्र मंडळ ओणी,
शाखाअध्यक्ष श्री महेश मटकर. मं.न.वि.से तालुका अध्यक्ष श्री.अमीर जडयार . यांच्या वतीने आभार मानण्यात आले