बातम्या

श्री ओम साई मंडळ होडखाड वरचीवाडी आयोजित साई भंडारा उत्सव व साई पालखी मिरवणूक विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..

खेड – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे होडखाड वरची वाडी येथे साई भंडारा कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली..या कार्यक्रमाच्या वेळी १२ गाव कुणबी शेतकरी समाज संघाचे अध्यक्ष व होडखाड गावचे सरपंच अनंत गोरीवले, ग्रामीण कमिटी अध्यक्ष- रामचंद्र गोरीवले, मुंबई कमिटी अध्यक्ष- कमलेश शिगवण, सा. कार्यकर्ते मनोहर दिवाळे,सर्व कमिटी मेंबर,महिला आघाडी, होडखाड गावचे शिक्षक,तुंबाड गावचे सरपंच बेंडू कदम, पो.पाटील-हरिश्चंद्र कदम,राधा कृष्ण सेवा मंडळ तुंबाड अध्यक्ष- संदीप घडशी,रेवाले शेठ- खेड,पप्पू यादव,विशाल बहुतुले,सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर सरचिटणीस- शिव शक्ती बाल मित्र बहिरवली पुणे मंडळ अध्यक्ष-छगन(राज) सखाराम भागणे,सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभाग कार्याध्यक्ष-हरिश्चंद्र नाचरे,तसेच अनेक गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, सरपंच, पोलिस पाटील आवर्जून उपस्थित होते, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले,साई स्टार इलेव्हन हा होडखाड गावचा क्रिकेट संघ आहे त्यांचा देखील यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देण्यात आले..२००३ या वर्षांपासून अगदी न चुकता हा उत्सव दोन दिवस अतिशय थाटामाटात सर्वांच्या उपस्थित पार पाडला जातो,पहिल्या दिवशी संपूर्ण गावात प्रत्येकाच्या घरोघरी साईंच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक वाजत-गाजत काढली जाते,सर्व साई भक्त अगदी तल्लीन होऊन यामध्ये सहभाग घेत असतात..संपूर्ण वातावरण भक्तिमय होत असते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत गोरीवले यांनी केले,अश्या या कार्यक्रमामध्ये सर्व कमिटी,ग्रामीण,पुणे,मुंबई मंडळ महिला मंडळ यांनी खूप मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल.सर्वांचे आभार आणि धन्यवाद… मानण्यात आले

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!