बातम्या

खापणे महाविद्यालयाच्या डॉ.मेश्राम यांची मुंबई विद्यापीठ इतिहास विभागाच्या रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती.

पाचल – (प्रमोद तरळ)
श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. एस. मेश्राम यांची मुंबई विद्यापीठ इतिहास विभागाच्या रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती झाली. ते गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ महाविद्यालयात कार्यरत असून मुंबई विद्यापीठाच्या अनेक कमिट्यांवर त्यांनी काम केले आहे. ते पीएचडी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहरजी खापणे, सरचिटणीस श्री. चंद्रकांतजी लिंगायत सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए.येल्लुरे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!