बातम्या

रायपाटणच्या जागॄत सेवा मंडळ गांगणवाडीतर्फे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन….

राजापूर;- (प्रमोद तरळ) तालुक्यातील रायपाटण येथील जागृत सेवा मंडळ गांगणवाडी यांच्या वतीने अक्षय तृतीया उत्सवानिमित्त मंडळाचे आद्य संस्थापक अनंत दादा गांगण स्मृती प्रित्यर्थ दि. ८ व ९ मे २०२४ रोजी वडचीआई मंदिर, रायपाटण,ता राजापूर येथे भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
सदर स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख १५०००/- व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु १०,०००/- स्मृतीचिन्ह, तॄतीय क्रमांक ३,५००/- व स्मृतिचिन्ह, चतुर्थ क्रमांक रु ३,५००/- रोख व स्मृतिचिन्ह याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वोत्तम खेळाडू यांनाही पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेतील नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी जितेंद्र गांगण – ९०६७२७२५३२, महेंद्र गांगण – ९४२१२११५९५, सखाराम गांगण (तात्या) – ९४२३८५५८३९, कॄणाल गांगण – ९२०९८९०९२७, अक्षय पांचाळ – ९६५३२१७१५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अमोल गांगण, चिटणीस सुधीर गांगण, सल्लागार प्रदीप सि. गांगण, अरविंद ज गांगण यांनी केले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!