बातम्या

शाळा विलवडे नंबर १ च्या भव्य मैदानावर जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न…….

लांजा:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील विलवडे येथे शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा विलवडे नंबर १ च्या भव्य मैदानावर प्रकाश झोतातील जिल्हास्तरीय खो-खो खुला गट (मुलगे ) यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. युवा क्रीडा संघ विलवडे यांनी सदर स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी तरुण मंडळाने पार पाडली. मुळातच विलवडे गाव हा खो-खो प्रेमी असल्याने गावातील अनेक खो-खो प्रेमी एकत्र येत भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पाडला. या स्पर्धेसाठी खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या ठिकाणाहून संघ दाखल झाले होते. एक पाहुणा संघ म्हणून सिंधुदुर्गातील संघही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. अनेक राज्यस्तरीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी विलवडे गावातील खो-खो प्रेमींसाठी एक पर्वणीच होती. अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाची चमक दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून विलवडे नंबर 1 शाळेतील विद्यार्थ्यांचा संघ ही या स्पर्धेमध्ये उद्घाटनाचा सामना खेळण्यास सज्ज होता. विलवडे नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक श्री परशुराम मासये व श्री प्रमोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या खेळाडूंनी खुल्या गटातील स्पर्धकांशी उत्तम प्रकारे झुंज दिली. या लहानग्यांचं क्रीडा कौशल्य पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या गावचे गाव प्रमुख माननीय श्री सुहासजी खामकर यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री रमेशजी खामकर, माननीय श्री सत्यवानजी खामकर माननीय विश्वनाथ खामकर माननीय मोहिते माननीय गुरव व इतर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यावेळी उपस्थित होती. सर्व ग्रामस्थांच्या उत्तम सहकार्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय खुल्या खो खो गट स्पर्धा याच मैदानावर उत्साह मध्ये पार पडल्या. ऋषभ नार्वेकर, अमेय कानसे, यश कानसे, तन्मय कांबळे, सौरभ दळवी, यश लोटणकर, शुभम साखरकर, सौरभ नार्वेकर विराज नार्वेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!