बातम्या

दापोलीत शेतकरी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न….

दापोली – (प्रमोद तरळ)
कोकणदीप मासिक आणि साप्ताहिक रत्नागिरी वृत्तांत हे मिडिया पार्टनर असलेला शेतकरी मार्गदर्शन मेळावा दापोली येथील टाॕप इन टाऊन या हाॕटेल मध्ये नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्याचे उद्घाटन मा.रविंद्र (भाई) कालेकर (प्रगतशील शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते,संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ,)यांच्या शुभहस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.मेळाव्याच्या शानदार उद्घाटनानंतर मेळाव्याची सुरुवात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमातील ABP माझा वरील शेतकऱ्यांवर आधारीत सुंदर अशा पोवाड्याने झाली.33 मिनिटांचा हा पोवाडा स्क्रीनवर पाहताना उपस्थित शेतकरी वर्ग खूपच भाऊक झाला होता.या पोवाड्यानंतर प्रोडक्ट प्रेझेंटेशन स्नेहल काताळकर मॕडम यांनी केले.यानंतर या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक मा. कृष्णा गावकर सर यांनी सेंद्रिय शेती का करायला पाहिजे आणि कमी खर्चात त्यातून अधिक उत्पन्न कसे मिळवायचे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची त्याचबरोबर सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात.पण आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहू.अशीही ग्वाहीही त्यांनी यानिमित्ताने शेतकऱ्यांना दिली. यानंतर शंका – समाधान या सेशनमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण अशी उत्तरे दिली.
व्यासपिठावर मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक मा. कृष्णा गावकर सर,तसेच पवन धोत्रे सर,मानसी दहीवलकर मॕडम उपस्थित होत्या.मृणाल बागडे मॕडम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर संपूर्ण मेळाव्याचे सुत्रसंचालन राकेश आंबेरकर सर यांनी केले. . या मेळाव्याला दापोली तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!