राजकीय

पक्ष संघटना म्हणून आमदार राजनजी साळवी यांच्या भक्कम पाठीशी : जिल्हा समन्वयक संजय पुनसकर.

रत्नागिरी : आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपले शिवसेनेचे नऊ आमदार होते. राजकीय घडामोडी नंतर नऊ पैकी तीन आमदार हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीले आहेत आणि राहतील त्याच्यामध्येच असलेले आपले. सगळ्यांचे लोकप्रिय लांजा-राजापूर विधानसभा चे आमदार,शिवसेना उपनेते राजनजी साळवी साहेब यांना लाच लुचपत विभाग रायगडकडून नोटीस देण्यात आली आहे. मालमत्तेच्या संदर्भात चौकशीच्या आदेश आहेत. या संदर्भात आज शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला रत्नागिरी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद शेरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजय पुनसकर म्हणाले की राजनजी साळवी साहेब हे पूर्णपणे संघटनेच्या पाठीशी आहेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे असलेले राजनजी एकनिष्ठ असणारे असे शिवसैनिक आहेत. ते कधीच कुठे जाणार नाहीत. आणि त्यांनी कुठे जाव त्यांनी ह्याच्यात राहू नये आणि हा पक्ष सोडावा अशी काहींची अपेक्षा आहे आणि ह्या सगळ्या अपेक्षेच्या माध्यमातून त्यांच्यावरती आज झालेली कारवाई असावी. ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना साळवी साहेबांवर  कारवाई होते हे आश्चर्याचा धक्का वाटतो.  साळवी साहेब पक्ष संघटनेमध्ये एकटे नाहीत तर आज आमदार राजनजी साळवी यांच्या पाठीशी तालुका अखंड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी पूर्णपणे भक्कम उभा असेल पक्ष प्रमुखांपासून जिल्हा लेवल पर्यंत असणारी सर्व मंडळी, बूथ कार्यकर्त्यांनपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे आम्हाला ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हेच सांगायचंय की राजन साळवी यांच्या पाठीशी पूर्णपणे संघटना आहे. पक्ष श्रेष्ठी त्यांच्या पाठीशी आहे. सर्व पदाधिकारी पाठीशी आहेत, राजन साळवींसारख्या एका सच्या कार्यकर्त्यावरती झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही या सगळ्या गोष्टीला सामोरे जाताना सर्व जुनी जाणती  पक्षामध्ये असलेली माणसं कार्यकर्ते हे साळवी साहेबांबरोबर आहेत.

चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार असेल तर शिवसेना आक्रमक भूमिका घेईल : विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे.
          राजन साळवी यांचा कट्टर शिवसैनिक-कार्यकर्ता ते नेता असा त्यांचा प्रवास आम्ही पहिला आहे. असे सांगताना विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे म्हणाले की पूर्ण जिल्हा पक्ष संघटना राजनजी साळवी यांच्या पाठीशी उभी आहे. अशा चुकीच्या पद्धतीने राजनजी साळवी यांना घेरण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर आम्ही शांत राहणार नाही. शिवसेना याबाबत आक्रमक भूमिका घेईल. कार्यकर्ता शिवसेना म्हणून रस्त्यावर उतरेल.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!