“धानोरा येथे नारी शक्ती व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या सबंधित महिलांचा भव्य महिला मेळावा आयोजित करण्यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली.दि.०६ सप्टेंबर २०२४धानोरा :- तालुका धानोरा येथे नारी शक्ति व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संबंधित महिलांभगिनी एकत्रीत यावे.व मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा मोठ्याने प्रसार व प्रचार व्हावा व महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा.याकरिता महिलांचा भव्य महिला मेळाव्याचे नियोजन करण्यासंबंधीत आज दि.०६ सप्टेंबर २०२४ रोज शुक्रवारी बैठकीचे आयोजन मा.खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.या प्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,भाजपा धानोरा तालुकाध्यक्ष सौ.लताताई पुन्घाटे,ता.महामंत्री विजय कुमरे, शहराध्यक्ष सारंग साळवे, संजय कुंडू, साजन गुंडावार, राकेश दास,गजानन साळवे,नरेंद्र भुरसे श्रावण देशपांडे, तसेच मोठ्या संख्येनी ग्रामिण व शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक जनता उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
- Home
- भारतीय जनता पार्टी- तालुका धानोरा येथे माजी खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न.