भाजपा नेते बाळ माने यांची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; दिवाळीत भाऊबीजही मोठ्या उर्जेने साजरी करण्याचे आवाहन.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी (द.) व दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभाव्यापी मंगळागौरी स्पर्धा व खेळ पैठणीचा ११ जि.प. गट व रत्नागिरी शहरात संपन्न झाल्या. यानिमित्ताने भाजपा नेते बाळासाहेब माने यांनी विधानसभेची एक परिक्रमा पूर्ण करत जवळपास ५ ते ६ हजार महिलांशी थेट संवाद साधला. प्रत्येक जि.प. गटात जवळपास १५ संघांनी सहभाग घेतला ज्यामध्ये एकूण २५०० स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.
“अनेक वर्षे महिलांच्या समस्या आणि सामाजिक स्थान यांबाबत प्राधान्याने विचार न झाल्याने समाजिक क्षेत्रात महिलांचा वावर कमी होत चालला होता. मात्र स्त्री-केंद्रित कल्याणकारी योजना राबवून म. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वात ही परस्थिती सकारात्मक बदलत आहे. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रथम एस.टी.चा प्रवास महिलांना परवडेल असा करण्यात आला आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पैसे येणार असल्याने त्यांना स्वतःचा विचार करायला सवड आणि सोबतच पुरेशी रक्कम प्राप्त होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय सुरु करणे, नृत्य शिकणे आदी गोष्टींसोबतच रस्ते, वाहतूक, वीज, पाणी, सुरक्षा, आरोग्य इ. बाबींमध्ये भरीव योगदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत असून येती दिवाळी एकमेकांच्या साथीने फटाक्यांच्या आतिषबाजीत धुमधडाक्यात साजरी करूया” असे आवाहन मा. आमदार तथा विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने यांनी केले.
यापैकी रत्नागिरी शहरात झालेल्या कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित राहून “बाळाभाऊंना साथ द्या.” असे उपस्थित महिलांना आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रम मा. बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरीच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, युवा नेते मिहीर माने, शिवानी सावंत यांसह महिला मोर्चा कार्यकारिणी व दि यश फाउंडेशन परिवार यांनी नियोजनबद्धरीत्या सम्पान्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जाहिरात..