टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे होणाऱ्या सहावी 17 वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांचा संघ सहभागी होणार आहे. या करिता लांजा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पुनस हायस्कूलचा श्रेयश सचिन पांचाळ गाव पुनस याची गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव सर, टीम मॅनेजर रमाकांत कांबळे सर, मुचकुंदी परिसर विकास संघ ग्रामीण उपाध्यक्ष गणेश खानविलकर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ यांनी पुनस हायस्कूल येथे भेट देऊन श्रेयस पांचाळ याला सिलेक्शन लेटर दिले.
ए एस ऍडव्हान्सरी सर्विसेस चे मालक श्री. अमोल पळसमकर सर आणि सौ. संचिता खानविलकर मॅडम, पुनस हायस्कूल मुख्याध्यापक श्री. व्हि. डी. बाईंग सर, क्रीडा शिक्षक श्री. जे. जी. पाटील सर, शारीरिक शिक्षण अध्यक्ष लांजा तालुका श्री. निलेश बागडी सर, देवधे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. सुशांत राईन सर, श्री. किरण गुरव, श्री. दिलीप दिवाळे सर, श्री. सागर भारती, श्री. दिनेश झोरे सर, टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी अध्यक्ष सुमित अनेराव सर, रोशन किरडवकर, महेश वीर, हर्षतेज पकये यांनी श्रेयस पांचाळ याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.
जाहिरात..