बातम्या

श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार ॲड. संदिप ढवळ यांना प्रदान.

शाहिरी माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक प्रबोधन करणा-या श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या लांजा शाखेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट रत्नागिरी (सर्वोदय छात्रालय) चे अध्यक्ष ॲड. संदिप ढवळ यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. म्हेत्रे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लांजा शाखेच्या वतीने गौरव रत्नांचा २०२४ हा कार्यक्रम लांजा येथील कुलकर्णी – काळे छात्रालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून राज्य संस्थेचे पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शाहीर हिंदूराव लोंढे – कोल्हापूर, मा. शाहीर गुलाबराव मुल्ला – सांगली, निवड समितीच्या अध्यक्षा मा. शाहीर चित्रा पाटील – मुंबई, लांजा शाखेचे अध्यक्ष श्री काशिराम जाधव, श्री. गंगाराम हरमले गुरूजी , माजी जिल्हा परिषद सदस्य चांद खान , मा. श्री. मोहन घडशी , शक्ती तुरा मंडळाचे लांजा शाखेचे अध्यक्ष श्री .पालकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना गटविकास अधिकारी मा. श्री. म्हेत्रे साहेब यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली असल्याचे मत व्यक्त केले. कारण ॲड. संदिप ढवळ हे पेशाने वकील असले तरी कॉलेज जीवनापासून ते आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांमध्ये करत असलेले सामाजिक काम पाहिलेले आहे. त्यांच्या पुर्ण कुटुंबाशी माझी ओळख आहे. विशेषतः कुळ कायद्यासंदर्भातील त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर सध्या ते श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट रत्नागिरी ( सर्वोदय छात्रालय) च्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. तसेच सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे येणाऱ्या अनेक गरजू पेशंटना त्यांचा सर्वतोपरी मदतीचा हात असतो. त्यामुळे योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाला आहे असे प्रतिपादन केले.
शाहीर हिंदूराव लोंढे व शाहीर गुलाबराव मुल्ला यांनी मनोगत व्यक्त करताना मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर समाजप्रबोधन केले पाहिजे. तसेच बदलत्या काळात प्रबोधनातही बदल घडवून आणले पाहिजेत असे मत व्यक्त केले. ॲड. संदिप ढवळ यांनी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ऋण व्यक्त केले व यापुढेही सामाजिक कार्याचा वसा सुरू राहील असे सांगितले.
या कार्यक्रमात विविध कला क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त रत्नांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये विश्वनाथन गंगाराम हरमले, सौ. संध्या तानाजी वाडेकर, बळीराम श्रीपत दळवी, मारूती भाऊ मुगुटराव, विद्याताई संदिप देवकर, महादेव कृष्णा पन्हळेकर, कविराज काशिराम जाधव, मोहन अनाजी गुरव, सुर्यकांत पांडुरंग गोरूले, मधुकर नरहरी अधटराव, ह.भ.प. रामदास नामे महाराज, सुभाष लुकाजी मोसमकर, वेदांत सुर्यकांत गोरूले यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरमले गुरूजी यांनी तर सूत्रसंचालन श्री. काशिराम जाधव व श्री.कविराज जाधव यांनी केले . दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!