बातम्या

जिल्हा परिषद गट गवाणे अंतर्गत सापूचेतळे येथे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश लाड याच्या उपस्थित काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.

अविनाश लाड यांना लांजा राजापूर साखरपा मतदार संघातून आमदार म्हणून विधानसभेत पाठवणार असा उपस्थितीत असलेल्या काँग्रस कार्यकर्त्यांनी निश्चय केला.

प्रतिनिधी :लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गट अंतर्गत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा सापुचेतळे येथे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि मा. उपमहापौर अविनाश लाड यांच्या उपस्थतीत पार पडला. मेळाव्याला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि अविनाश लाड प्रेमी यांनी उपस्थिती लावली होती. रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अविनाश लाड यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की हा फक्त मेळावा नसून मोठ्या प्रमाणात उसाळलेला जनसागर आहे आणि हाच जनसागर मला विधानसभेत पाठवणार असा विश्वास अविनाश लाड यांनी व्यक्त केला. कोणातील माणूस हा रोजगार पासून वंचित आहे, आज आपली घरे ओसा पडली आहेत, याला जबाबदार येथील राज्यकर्ते आहेत, काँग्रेस पक्ष हा तुम्हाला न्याय देण्यासाठी तत्पर असेल,
जो विश्वास जे प्रेम माझ्यावर केले आहे, तो तुमचा विश्वास पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. अनेक वर्षे या मतदार संघात कोणाही शाश्वत विकास झालेला नाही त्यामुळे गाव -वाडी ,वस्ती रिकामी होऊन मुंबई,पुणे नाशिक अशा विकसित शहरात अनेक तरुण पिढी नोकरीसाठी स्थलांतरित होत आहे त्यामुळे हा अतिशय चिंता व्यक्त करणारे आहे. माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिले तर मतदार संघातील अनेक प्रश्न ,समस्या विधानसभेत मांडून न्याय देईल असे लाड म्हणाले.
लांजा तालुका अध्यक्ष श्री. श्रीकुष्ण हेगिष्टे यांनी आपले विचार मांडताना काँग्रेस पक्ष हा विचाराचा पक्ष आहे, आणि तळागाळातील लोकांचा विकास काँग्रेस पक्ष हाच करु शकतो, आज लांजा शहरातील, आरोग्य, दळवळण, रस्ते, शाळा, यासारखे प्रश्न अजून सुटले नाहीत,तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची म्हणून आपल्याला श्री.अविनाश लाड याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे आहे,लांजा युवा तालुका अध्यक्ष, श्री. प्रतिक खरात यांनी गवाणे गटातून नाही तर सर्व लांजा तालुक्यातून, काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान येथील मतदार करतील ,असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, यावेळी रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. सतोष गोताड, तालुका,अध्यक्ष श्रीकूष्ण हेगिष्टे,उपतालुका अध्यक्ष श्री विलास चौगुले,अल्पसख्यक तालुका अध्यक्ष श्री. महमुदू पावसकर,युवा तालूका अध्यक्ष, प्रतिक खरात,श्री.सूदेश चव्हाण श्री. बब्या खोत, श्री. सुनिल खानविलकर,श्री. प्रथमेश बोडेकर ,श्री प्रथमेश गोरे श्री. रवी राणे,दिलीप खानविलकर, दिपक मांडवकर,हेमंत शिंदे ,प्रकाश दळवी ,संजय सुर्वे, संतोष जाधव स्थानिक पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते,

दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!