बातम्या

तक्षशिला पतसंस्था पाली तर्फे समीर शिगवण यांचा सत्कार.

शिगवण यांनी केलेल्या स्मरणिकेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते प्रकाशन; स्मरणिकेचे केले तोंडभरून कौतुक

तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पालीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम नुकताच पाली येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते तक्षशिला पतसंस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या तक्षशिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुस्तक प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक पालकमंत्री उदय सामंत यांना प्रचंड भावले. त्यांनी याविषयी संस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता या पुस्तकाची मांडणी सजावट, संपादकीय काम हे समीर शिगवण यांनी केले आहे, ते उत्कृष्ट डिझायनर आहेत शिवाय तरुण भारत येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत, असे सांगितले.

या कार्यक्रमांत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांच्या कार्याचा गौरव करत, पतसंस्था वाटचाल करत आहे. 25 कोटीच्या ठेवी संस्थेने जमा केल्या आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्षात 100 कोटीच्या ठेवी होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्मरणिकेचे कौतुक करताना म्हणाले, ग्रामीण भागातील एक तरुण उत्तमप्रकारे डिझाईन्स आणि मांडणी सजावट करून आपली कला जोपासत आहे. त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. असे तरुण पुढे आले पाहिजेत, असे म्हणत स्मरणिकेचे कौतुक केले. यावेळी समीर शिगवण यांचा पाली गावचे खोत संतोष सावंत देसाई, पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष अमोल सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना रत्नागिरी तालुका प्रमुख महेश म्हाप, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, नाणिजचे सरपंच विनायक शिवगण, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकर टिळेकर, रामचंद्र गराटे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पालीचे खोत संतोष सावंतदेसाई, नाणिजचे मा. सरपंच गौरव संसारे, ज्येष्ठ समाज सेवक रमेश कसबेकर, पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद हितचिंतक, संस्थेचे आजी, माजी संचालक आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!