बातम्या

मंडळ अधिकारी, साटवली यांची सुडबुद्धीने तक्रार ? की अजून बरचं काही?

नियमबाह्य काम न केल्याने खटाटोप; मंडळ अधिकाऱ्यांचा खुलासा!साटवली : साटवली गावातील एका ग्रामस्थाने लांजा तहसीलदार यांना तक्रार अर्ज करत साटवली मंडळाचे मंडळ अधिकारी आणि तत्कालीन तलाठी हे कार्यालयात थांबत नसल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याने समस्या होत असल्याची तक्रार लांजाच्या तहसीलदारांना केली होती. त्यासंदर्भात वर्तमानपत्र व डिजिटल मिडिया मध्ये बातमी देखील छापून आली होती.
या प्रकरणी दखल न्युज महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक यांनी प्रत्यक्ष मंडळ अधिकारी कार्यालय, साटवली येथे भेट दिली व वस्तुस्थिती जाणून घेतली. या भेटीत साटवली मंडळ अधिकारी कार्यालय, साटवली येथे कनेक्टीव्हिटीची समस्या असल्याचे समोर आले. मंडळ अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार येथे नेटवर्क कनेक्टीव्हिटी ची समस्या आहे, त्यांच्या अखत्यारीत २७ महसूली गावे आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चौकशी करीता फिरावे लागते.
गौण खनिज उत्खनन संदर्भातील तपासणी व चौकशी इत्यादी कामे देखील पाहावी लागतात. गौण खनिज उत्खननाची साटवली मंडळातील बेनी बुद्रुक, वाडीलिंबू, आगवे या गावी उत्खनन कामासाठी तपासणी साठी आठवड्यातून २ वेळा भेट द्यावी लागते. नियोजित दौरा व बैठकांकरिता वरिष्ठांच्या सांगण्यावरून तहसीलदार कार्यालयात बैठकी करीता वेळोवेळी हजर राहावे लागते. साटवली मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये आठवड्यातील २ दिवस मंडळ अधिकारी हजर असतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये साटवलीच्या मंडळ अधिकाऱ्यांनी पदाचा अधिभार स्वीकारला तेव्हापासून आजपर्यंत या तक्रारी आधी कोणाचीही तोंडी अथवा लेखी तक्रार नाही. प्रत्येक दिवसांचा दैनंदिन कामाचा लेखाजोखा दैनंदिन नोंद वहीत नमूद केलेला आहे. प्रत्येक फेरफार नोंदीसाठी कालमर्यादा असल्याने आणि सर्वच फेरफार नोंदी या ऑनलाईन असल्याने जिथे नेटवर्क कनेक्टीव्हिटी आहे तेथे बसून नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून मंडळ अधिकारी काम करतात, साटवली येथे कनेक्टीव्हिटीची समस्या असल्याने कार्यालयात बसून वेळेचा आपव्यय करण्यापेक्षा लोकांची कामे तहसील कार्यालय लांजा येथे बसून मंडळ अधिकारी काम करतात असे त्यांनी सांगितले. तसेच लेखी म्हणणे देखिल यापूर्वी तहसिलदार लांजा यांना सादर केले असल्याचे सांगितले.
कोणत्याही ग्रामस्थांची तक्रार नसताना एका व्यक्तीने जाणूनबुजून व सूडबुद्धीने सदर तक्रार केली असल्याचे जाणवते असे मंडळ अधिकारी यांनी सांगितले. एक नियमात न बसणारे काम करण्यास वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न करून देखील ते काम न केल्याचा राग मनात बाळगून सदर तथ्य नसलेली तक्रार मानसिक त्रास देण्याच्या हेतूने केलेली आहे असे मंडळ अधिकारी यांनी सांगितले. फेरफार नोंदीवर निर्णय घेणे, तपासणी करणे, चौकशी करणे, वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे, निवडणुकीची कामे, इत्यादि कामे मंडळ अधिकाऱ्यांकडून केली जातात. सर्व पक्षकारांचे फोन कार्यालयीन वेळेत आम्ही उचलतो, त्यांच्याशी संवाद मंडळ अधिकारी, साटवली या नात्याने मी साधतो व नागरिकांची सेवा व्हावी याच उद्देशाने कार्यरत असल्याचे आणि शासनाच्या नियमावली नुसार काम केले जात आहे असे साटवली मंडळ अधिकारी यांनी सांगितले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र .

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!