बातम्या

जि. प.शाळा वाडावाघ्रण येथे शिवसेने ( उ.बा.ठा.) तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर :- ( दळे) :- शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यातून दळे ग्रामपंचायत मधील जि. प.शाळा वाडावाघ्रण मध्ये आज दिनांक १४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा दळे” तर्फे शिवसेना नेते श्री अनिलजी परब साहेब यांच्या सौजन्याने, मुंबईचे शाखाप्रमुख व जैतापूर गावचे सुपुत्र श्री संदिपजी शिवलकर साहेब यांच्या प्रयत्नाने शैक्षणिक साहित्य (शालोपयोगी वहया) चे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांनी त्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाला युवासेना जिल्हा समन्वयक श्री. दूर्गेशजी साळवी, श्री. पारस पाटील पी. ए. सोशल मीडिया, समीर शिरवडकर शिवसहकार सेना उपजिल्हा संघटक, प्रविण गावकर युवासेना उपविभाग युवाधिकारी, स्वप्नील सोगम उपविभाग यूवा समन्वयक, संतोष लासे शाखाप्रमुख, सौ. नैशदा गिरकर ग्रा.पं. सदस्य, जेष्ठ शिवसैनिक प्रकाश लासे तसेच शिक्षकवर्ग कर्मचारी सौ.शिल्पा राठोड, श्री. बालाजी चव्हाण, सौ. सिया जाधव आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!