टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे होणारी सहावी 17 वर्षातील टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांचा संघ सहभागी होणार आहे. याकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी कडून जिल्हास्तरीय निवड चाचणी रविवार दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी येथे घेण्यात आली. त्या निवड चाचणी मध्ये खालील मुलांची निवड रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये करण्यात आली आहे. कर्णधार वेदांत विलास तांबे (रत्नागिरी), तन्मय संदीप सावंत (रत्नागिरी), सुरज सुरेश हातस्कर (लांजा), प्रज्ञेश प्रचित मोहिते (संगमेश्वर), दीप शिवाजी शितप (रत्नागिरी), आयान उमेश लोकरे (रत्नागिरी), कुणाल राजेंद्र बारगुडे (रत्नागिरी), तनिष शंकर मोहिते (गुहागर), आर्यन महेश माने (रत्नागिरी), अविनाश काशिनाथ गुरव (रत्नागिरी), श्रेयश सचिन पांचाळ (लांजा), निषाद रायबा तांबे (रत्नागिरी) या मुलांची निवड करण्यात आली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 23 ते 25 ऑगस्ट 2024 ला बारामती येथे होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा देताना टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव सर, प्रशिक्षक हर्षतेज पकये सर, टीम मॅनेजर रमाकांत कांबळे सर, मुचकुंदी परिसर विकास संघ ग्रामीण उपाध्यक्ष गणेश खानविलकर, ए. एस. ॲडव्हायसरी सर्विसेस चे मालक श्री. अमोल पळसमकर सर आणि सौ. संचिता खानविलकर मॅडम, पुनस हायस्कूल मुख्याध्यापक श्री. व्हि. डी. बाईंग सर, क्रीडा शिक्षक श्री. जे. जी. पाटील सर, शारीरिक शिक्षण अध्यक्ष लांजा तालुका श्री. निलेश बागडी सर, देवधे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. सुशांत राईन सर, श्री. किरण गुरव, श्री. दिलीप दिवाळे सर, श्री. सागर भारती, श्री. दिनेश झोरे सर, टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी अध्यक्ष सुमित अनेराव सर, रोशन किरडवकर, महेश वीर यांनी श्रेयस पांचाळ याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.