बातम्या

अपरांत हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध..

चिपळूण : (ओंकार रेळेकर)
हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डायलेसिस ची आवश्यकता असलेल्या
रुग्णांकरिता डायलिसिस म्हणजे जीवन मृत्यू मधील दुवा असून, रुग्णांना ही वैद्यकीय प्रक्रिया त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना वारंवार करून करून घ्यावी लागते. अशा सर्व रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
रुग्णाच्या आपत्कालीन प्रसंगी डायबेटीस, हायपर टेन्शन, मूत्रपिंडाचे विकार, जंतुसंसर्ग अशा आजारांच्या रुग्णामध्ये क्रियाटिनचे प्रमाण वाढून त्यांना किडनी फेल्युअर होतो अशा वेळी अशा रुग्णांसाठी पेरीटोनियल डायलिसिस व हिमो डायलिसिस सेवा सुद्धा उपलब्ध आहे.
विषबाधा झालेल्या रुग्णांना चारकोल डायलेसिस ,
जी बी सिंड्रोम सारख्या दुर्मिळ व असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी प्लास्मा फेरेसिस या अत्यंत गरजेच्या व महत्वाच्या high end उपचार प्रक्रिया या विभागामध्ये उपलब्ध आहेत .
२४ तास तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता अनुभवी व कुशल नर्सिंग स्टाफ , हिपॅटायटीस बी पॉसिटीव्ह असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र डायलीसिस सेवा , अतिदक्षता विभागामध्ये आपत्कालीन रुग्णांसाठी डायलीसिस ची सुविधा ,डायलीसिसच्या रुग्णांसाठी प्रत्येक महिन्यामध्ये निष्णात नेफ्रोलॉजिस्ट यांचे समुपदेशन व सल्ला, अद्ययावत मशिन्स ,कुशल व अनुभवी स्टाफ अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसहित हा विभाग परिपूर्णआहे.
या विभागातील गंभीर रुग्णासाठी अपरांत हॉस्पिटल चे फिजिशियन डॉ.गौतम कुलकर्णी व डॉ.हर्षद होन यांचे द्वारे उपचार व सल्ला मिळणार आहे. एकाच छताखाली सर्व सुविधा देण्याचे ध्येय बाळगलेल्या अपरांत हॉस्पिटलने ही रुग्णाभिमुख सेवा हॉस्पिटलमध्ये सुरू केली आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणी साठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.☎️
९३०७५६६७००
९८६०४७१३४८
९०११४११०७८
८७९३५१५६३१ दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!