बातम्या

शिंदे-फडणवीस सरकार भटके-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर : भाजपा भ.वि.जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे.

रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकार भटके विमुक्त यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी म्हटले आहे. सरकारने वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोष वाढ केली आहे. भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, भटके विमुक्तांच्या विविध राजकीय, अराजकीय संघटना यांनी गेली अनेक वर्षे ही मागणी केली होती.
महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष देत सकारात्मक पावले उचलली आहेत. कोकणात सह्याद्री पर्वताच्या द-याखो-यात वसलेल्या धनगरवाड्यांच्या विकासाला वरदान असणारी, ” वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना या योजनेत यापुर्वीच्या जिआर नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद असल्यामुळे या योजनेचा परीपुर्ण फायदा धनगरवाड्यांना, भटके विमुक्तांच्या वस्त्यांना होत नव्हता.
धनगरवाड्यांना लोकसंख्येची अट शिथिल करुन अनुदानात वाढ करावी यासाठी मागील अनेक वर्षे विविध स्तरातून, संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याची दखल सरकारने घेतली. .
या जिआर नुसार या योजनेच्या फायद्याच्या बाजू आशा आहेत की..
1) यापुर्वी 51 ते 100 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामासाठी फक्त रू 4 लाखाची तरतूद होती तेथे आता रु 15 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
2) यापुर्वी 101 ते 150 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामासाठी फक्त रु 6 लाखाची तरतूद करण्यात आली होती तेथे आता रु 20 लाख मिळणार आहेत.
3) यापुर्वी 151 च्या पुढे लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकास कामांसाठी फक्त रु 10 लाखाची तरतूद होती तेथे आता लोकसंख्या 151 ते 300 लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना रु 25 लाख मिळणार आहेत.
4) सुधारीत जिआर मध्ये बहुसंख्येने भटक्या विमुक्त समाजांची लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर बांधण्यासाठी रु 25 लाखाची तरतूद केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात धनगरवाड्या व अन्य भटक्या विमुक्त समाज वाड्यांवर मोठ्या प्रमाणात संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर मोठ्या प्रमाणात होतील.
विद्यमान शिंदे फडणवीस सरकारने दिनांक 30 मे 2022 च्या वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या सुधारीत जिआर ची तातडीने अमलबजावणी करण्याचे आदेश सबंधित प्रशासकीय विभागांना दिल्यामुळे कोकणातील धनगर समाज व अन्य सहयोगी भटक्या विमुक्त समाजांमध्ये उत्साहाचे, समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार भटक्या विमुक्त यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक असून यानंतर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर वाड्या-वस्त्यांमधील प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आमदार नरेंद्रजी पवार यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे (रत्नागिरी द.) जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात.. एकादशी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : निलेश उर्फ (भाऊ) आखाडे.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!