बातम्या

महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या १३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या बैठकीला कोकणातून असंख्य कार्यकते जाणार;कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांची माहिती..

चिपळूण : (ओंकार रेळेकर) महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या १३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या बैठकीला कोकणातून असंख्य कार्यकते जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस
बॉईज संघटनेचे कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलिस बॉईज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची राज्यस्तरीय बैठक १३ नोव्हेंबर रोजी शिर्डी पोलीस शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे, असे या संघटनेच्या महाराष्ट्रा तील पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.अशी माहिती शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व कोकण प्रमुख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सैफ सुर्वे यांनी दिली.यावेळी अहमदनगर पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, शिर्डी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राहता पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष सुदर्शन गोंदकर, राहता तालुका उपाध्यक्ष रितेश भोसले, विद्यार्थी संघटक तन्मय गोंदकर, सदस्य विवेक भडकवाड, गौरव भडकवाड, प्रसादभैय्या पाटील यांनी केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!