बातम्या

झेप प्रतिष्ठान तर्फे जव्हार येथील बेहडपाडा आदिवासी पाड्यात २३० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

इनरीच सलोन यांच्या माध्यमातून आणि झेप प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाने जव्हार येथील बेहडपाडा या आदिवासी पाड्यात 230 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप आणि मुला मुलींचे केस कापून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.शहरातील तापमान कमी होत असताना जव्हार सारख्या थंड हवेच्या ठिकाणी तापमान अत्यंत खालची पातळी गाठत असताना आदिवासी पाड्यातील मुलांना थंडीपासून रक्षण करण्यासाठी स्वेटरची अत्यंत गरज असते परंतु गरिबीमुळे या मुलांना आणि त्यांच्या पालकांना स्वेटर घेणे परवडत नाही.यावर उपाय म्हणून झेप प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने झेप प्रतिष्ठान सदस्य श्री कल्पेश नाही आणि enrich सलून यांची संपूर्ण टीम यांनीही जबाबदारी पेलत या मुलांना शहरापासून जवळपास 200 किलोमीटरवर असणाऱ्या बेहेडपाडा या आदिवासी गावात जाऊन स्वेटर वाटप केले.तसेच यातील ज्या मुलांचे केस प्रमाणापेक्षा जास्त वाढले होते त्या मुला मुलींचे केस मोफत कापून देण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा टीमचे गावातील गावकऱ्यांनी आणि शिक्षक वर्गांनी मनापासून कौतुक केले.जव्हार हा तालुका आदिवासी भवन असून येथे रोजंदारी आणि वीट भट्टीवर काम करणारे भरपूर लोक आहेत. आई वडील कामानिमित्त शहरात किंवा कोणत्या वीट भट्टी वरती असताना घरातल्या मुलांची जबाबदारी ही घरात असणारा ज्येष्ठ नागरिक किंवा घरातील मोठ्या मुलांवरती पडते. अशावेळी थंडी वाऱ्यापासून वाचण्यासाठी मिळेल ते कपडे वापरून मुलं शाळेत येण्याचा प्रयत्न करतात.या मुलांसाठी अशा स्वेटर वाटप उपक्रमाची फारच गरज असल्याने अशा प्रकारचे कार्यक्रम विविध आदिवासी पाड्यात राबविण्यात यावे असे झेप प्रतिष्ठानचे श्री विकास धनवडे यांनी सांगितले.

जाहिरात..
जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!