राजकीय

पत्रकाराच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी झाली पाहिजे : ज्योतिप्रभा पाटील.

रत्नागिरी : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे. पत्रकार शशिकांत वारीशे कोकणच्या माती साठी शहीद झाले आहेत. हा पत्रकारितेवरचा हल्ला नसून लोकशाहीवरचा हल्ला आहे, आणि मारेकरी हा नुसताच खुनी नसून, त्याचे हे कृत्य एका देशद्रोहा प्रमाणे आहे, असही म्हटलं जाऊ शकत असे आम आदमी पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा संयोजक श्री ज्योतीप्रभा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य शासनाला आवाहन केले आहे. दिनांक - ०९/०२/२३, रत्नागिरी - श्री ज्योतीप्रभा पाटील यांनी पोलिस महासंचालकांसह, राज्याच्या माननीय मुख्य सचिव श्री मनू कुमार श्रीवास्तव यांना राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाइम्स' मध्ये कार्यरत असलेले श्री. शशिकांत वारिशे नामक पत्रकाराच्या हत्येची CBI चौकोशी करण्याची मागणी केली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. श्री ज्योतिप्रभा पाटील यांनी शासनाकडून या पत्रकाराच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत जाहीर झाली पाहिजे अशी देखील मागणी केली असून, ते बोलले आहेत की "श्री.वारिशे आपले आयुष्य एक पत्रकार म्हणून जगले, आणि त्यांच्या लेखणीच्या जोरावर त्यांनी ज्या गोष्टी उघडकीस आणल्या, त्यामुळे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही की ते कोकणच्या मातीच्या संरक्षणासाठी शहीद झालेले एक हुतात्मे आहेत. श्री.पाटील यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात ते माननीय मुख्य सचिव श्री मनू कुमार श्रीवास्तवजी महाराष्ट्र राज्य शासन, मंत्रालय, मुंबई. यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की हल्लीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात घडलेल्या अत्यंत शोकजनक आणि चिंतित करणाऱ्या घटने बाबत. बोलताना ते म्हणतात की रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील दुःखद घटनेच्या प्रकाशात मी आपल्याला हे पत्र लिहीत आहे.

जाहिरात..


हल्लीच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री रत्नागिरीत येऊन गेले होते, ज्या ठिकाणी त्यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. आणि त्यानंतर प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका वर्तमानपत्रातून मांडणाऱ्या एका पत्रकारावर प्राण घातक हल्ला करत त्याच्या अंगावर गाडी घालून त्याना ठार मारण्यात येतं. ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणाऱ्या आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर अशी वेळ येणे, याचा असा अर्थ होतो की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे.
मयत पत्रकार कै. शशिकांत वारिशे यांनी मायभूमी कोकणच्या संरक्षणासाठी बलिदान दिले आहे, ते आपले आयुष्य एक पत्रकार म्हणून जगले, आणि त्यांच्या कलमेच्या जोरावर त्यांनी ज्या गोष्टी उघडकीस आणल्या, त्यामुळे त्यांचे दुःखद निधन झालेला आहे, या सगळ्या गोष्टींना गृहीत धरत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही की ते कोकणच्या माती साठी शहीद झाले आहेत.
त्यामुळे, ज्या प्रकारे दिल्ली राज्य शासन जनतेच्या आणि आपल्या मातीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिकांना एक कोटी रुपयांचा मोबदला देते, त्याच प्रकारे, अनेक रत्नागिरीच्या नागरिकांची आणि या माननीय पत्रकाराच्या हितचिंतकांची अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्य शासन देखील, संवेदनशीलता दाखवत ताबडतोब या पत्रकाराच्या कुटुंबीयांना पुरेशी आर्थिक मदत जाहीर करेल, आणि या प्रकरणाची Special Investigation Team अथवा CBI मार्फत सखोल चौकशी करून जलद न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी असे श्री ज्योतीप्रभा पाटील, संयोजक, आम आदमी पार्टी, रत्नागिरी यांनी म्हंटले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!