बातम्या

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पूर्ण ताकतीने उतरणार : अविनाश लाड..

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण तालुका काँग्रेस चे अध्यक्ष प्रशांत यादव यांचे तालुक्यात कौतुकास्पद काम सुरू आहे. तालुक्यात काँग्रेस पक्ष एकसंघ काम करीत आहे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी येथे बोलताना सांगितले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस
एकदा सक्रिय झाली आहे. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिट्या स्थापन करून सातही सेल ‘अॅक्टिव्ह’ करणार आहोत, असे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी पुढे बोलतांना सांगितले. ब्राह्मण सहायक संघ सभागृहात जिल्हा काँग्रेसची बैठक झाली. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, इब्राहीम
दलवाई, भरत लब्धे, अशोक जाधव, नंदू थरवळ, अल्पेश मोरे, वासू मेस्त्री यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष,या बैठकीनंतर अविनाश लाड यांच्यासह माजी खासदार हुसेन दलवाई, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हुसेन दलवाई म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेस विकलांग आहे, हे आम्हाला मान्य आहे. काँग्रेस मजबूत करण्यासाठीच बैठकीचे आयोजन केले होते. आता . प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय बूथकमिट्या स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे.
काँग्रेसचे सातही सेल ‘अॅक्टिव्ह’ केले.जातील, असे त्यांनी सांगितले.तयारीला लागा बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे
म्हणणे जाणून घेण्यात आले. ज्यांना जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्याआहेत. त्यांना तयारी करण्याच्यासूचना या बैठकीत देण्यात आली.
…अन्यथा एकटे लढू आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय प्रदेशचा आहे. आगामी
निवडणुका लढण्यास आम्ही सज्ज आहोत. आघाडी झाली तर ठीक अन्यथा आमच्यात एकटे लढण्याची ताकद आहे, असे लाड म्हणाले. अविनाश लाड म्हणाले की, काँग्रेस
सातत्याने विविध मुद्यांवर आंदोलन करत आहे. महामार्गासाठी पेण, पनवेल, रत्नागिरी येथे आंदोलन करण्यात आले. यापुढेही जनतेच्या प्रश्नासाठी
आंदोलने करू. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, काँग्रेस पक्ष सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी लढा
देत आहे. येथील शहर व तालुक्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी जोमाने तयारी सुरू
आहे. लवकरच संपर्क कार्यालय सुरू होत असल्याचे ते म्हणाले. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!