राजकीय

देवीहसोळ येथे दि. ३ व ४ जानेवारी रोजी श्री आर्यादुर्गा देवीचा भव्य जत्रोत्सव…..

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीने देवीहसोळ येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बुधवार दि. ३ व गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी श्री आर्यादुर्गा देवी जत्रोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे
श्री आर्यादुर्गा देवी व नवदुर्गा देवी यांची भेट म्हणजेच श्री आर्यादुर्गा जत्रोत्सव.राजापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला अनेक भक्तगण आपली उपस्थिती लावतात या जत्रोत्सवाच्या निमित्ताने लिंगवाडी नाट्य मंडळ मुंबई (देवीहसोळ, राजापूर) निर्मित कौटुंबिक व ह्रदयस्पर्शी नाटक “इथेच संपली नाती…? या नाटकाचा प्रयोग होणार आहे अधिक माहितीसाठी श्री रमेश विचारे – (अध्यक्ष) ७०२१७३९९९२, श्री अविनाश भोवड – (सेक्रेटरी) ९२२३१४७६८४, श्री दिनेश विचारे – (खजिनदार) ९३२४३२३२२८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा देवी व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था (देवीहसोळ) मुंबई व सर्व ग्रामस्थ यांनी केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!