राजकीय

मंत्री रवींद्र चव्हाणच कोकणातील रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे असणार उमेदवार..?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळण्यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसत आहे. शिवसेना भाजप चे लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी द्या म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते लवकरच प्रदेश अध्यक्ष बावनकुळे याच्या मार्फत कार्यकर्ते ना.अमित शहा याची दिल्ली ला भेट घेणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

शिंदे गट शिवसेनेकडून किरण सामंत तयारी लागले होते. किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, अशी त्यांची आशा होती. पण, आता अचानक भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने या जागेवर तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाने मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित केल्याचे कळत असून. असे झाल्यास भाजप कार्यकर्त्यांना अत्यानंद होणार आहे.  कोणत्याही परिस्थितीत तळ कोकणात भाजपाला आपले खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे भाजपने याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आणि या साठी भाजपाने कंबर कसली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ही आहेत.  रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीने ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना तगडे आव्हान देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!