लेख

आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत – तरुणांची भूमिका

मित्रहो भारतातील सर्वात मोठी समजली जाणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी, या परीक्षेसाठी दरवर्षी तब्बल दहा लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात, मात्र 800 ते 1000 जागा फक्त भरल्या जातात. त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी सर्वात मोठी समजली जाणारी पीएससी ची परीक्षा यासाठी दरवर्षी दोन लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात, मात्र 600 ते 700 जागा भरल्या जातात. त्यापुढे जाऊन अनेक विद्यार्थ्यांना देशसेवा करायची इच्छा असते त्यांच्यासाठी सर्वात मोठी समजली जाणारी परीक्षा म्हणजेच एनडीए, या परीक्षेसाठी सुद्धा दरवर्षी तीन लाखाहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात मात्र 400 ते 500 सीट फक्त भरल्या जातात. या परीक्षांचा आणि अर्जांच्या आकड्याचा सारासार विचार करता लक्षात येतं की, आज आपल्या देशातील युवक हा सरकारी नोकरीच्या भरवशावर मोठ्या संख्येने अवलंबून असलेला दिसून येतो. परिणामी त्यांची इतर क्षेत्रातील प्रोडक्टिव्हिटी ही कुठेतरी मागे पडताना दिसते, देशाच्या विकासासाठी पूरक ठरणारे व्यवसाय याच्यावरती कुठेतरी झाकण युवकांद्वारे टाकलेले दिसते, आणि आपण या परीक्षेत पात्र ठरू शकलो नाही म्हणून दुसरा मार्ग शोधण्याऐवजी, सरकार किती कुचकामी किंवा देशाची व्यवस्था ही किती अप्रगत आहे याचा डंका आज युवकांद्वारे विशिष्ट पक्षाचा अंध कार्यकर्ता बनवून पेटवताना दिसतो त्यावेळेस आज या विषयावर आवरजुन लिहावस वाटत, ते म्हणजे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत तरुणांनी चालवलेल्या विकसित देशाचा मार्ग तयार करण्यासाठी.

मित्रहो कोणत्याही राष्ट्राची शक्ती प्रगती आणि विकास हा त्या राष्ट्राच्या आत्मनिर्भरतेवर अवलंबून असतो.
त्यासाठी देशाला युवकांकडून अपेक्षा असते आणि त्यात आपला भारत देश आज जगातील सर्वात तरुण लोकसंख्य असलेल्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर बनवून देशाचा विकास करण्याची हीच वेळ आहे मात्र संधीचं सोनं करायचा उशीर मात्र आहे.

मुळात भारताला आत्मनिर्भर बनवायचं असेल तर सर्वप्रथम देशावर असलेला आपला भार कमी करून स्वतः आत्मनिर्भर बनण्याची भूमिका प्रत्येक युवकाने घेणे गरजेचे आहे. पगारी नोकरीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड बनवलेल आयुष्य आणि नोकरीसाठी वर्षानुवर्ष बेरोजगार राहण्याचा निवडलेला मार्ग तोडून, आज युवकांनी स्वतःच्या शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून देशाच्या विकासात्मक व्यवसायांमध्ये उडी घेण मला फार महत्वाचं दिसून येतं. कारण ज्या देशात प्रत्येक क्षेत्रातील उद्योगधंदे विकसित असतात, आपसूकच त्या देशातील बऱ्याच प्रमाणात गरजा या देशांतर्गतच भागवल्या जातात. आज भारतात नोकऱ्यांसाठी जागा मात्र मर्यादित आहेत, पण भारताला मिळालेला निसर्ग वातावरण भौगोलिक स्थिती ही अमर्यादित असल्याकारणाने अनेक प्रकारच्या उद्योग धंद्यांसाठी पूरक असं वातावरण आपल्या देशात आहे याचा अभ्यास युवक ज्यावेळेस करतील त्यावेळेस प्रत्येक प्रकारचे व्यवसाय उदयास येऊन भारत देश आत्मनिर्भर बनवून विकासाच्या प्रगतीपथावर असेल.
आणि एकदा का देश आत्मनिर्भर बनला की महामारी किंवा महायुद्धांमुळे आंतरराष्ट्रीय आयात निर्यातींवर बसणारा फटका , देशांची कोलमंडणारी आर्थिक स्थिती घसरणाऱ्या चलनाचा टक्का याचा कुठलाही फरक भारताच्या विकासावर कधीही होणार नाही. म्हणूनच आत्मनिर्भर भारतासाठी तरुणांची भूमिका महत्वपूर्ण ठरते.

आत्मनिर्भर भारताच्या विकासाला धक्का पोहोचवणारी आणखीन एक देशांतर्गत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, राजकारण. देशाच्या विकासासाठी हवं असलेलं राजकारण आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये केवळ देशाच्या खुर्चीसाठी केलेले दिसत. आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी बनवलेली पॉलिसी ही अमलात आणेपर्यंत सत्ता बदल , पुन्हा नवी पॉलिसी, पुन्हा सत्ता बद्दल. यामध्ये देशाचा विकास थांबलेला दिसतो. म्हणून आज युवक हा नेत्यांसाठी झालेल्या दंगली चा भाग होण्याऐवजी एक सुशिक्षित नेता बनण्यासाठी प्रयत्न करेल आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, बनवलेली पॉलिसी ही पाच वर्षानंतर येणाऱ्या नवीन सत्तेसोबत तीच पॉलिसी कॅरी फॉरवर्ड करेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने देश आत्मनिर्भर बनून जगात विकसित देश म्हणून नावाजलेला असेल.

देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशातील लोकसंख्या तरुणांद्वारे मर्यादित ठेवणे आज जास्त गरजेचे आहे. प्रश्न पडेल की आत्मनिर्भरता आणि लोकसंख्या यांचा काय संबंध. तर मित्रहो आज लोकसंख्या जास्त असल्यामुळे अनेक गोष्टी भारतात उपलब्ध असूनही त्या पुरेशा नसल्याने त्या गोष्टींची सुद्धा आयात देशाला करावी लागते. पण जर लोकसंख्या मर्यादित असेल तर नक्कीच आयातीपेक्षा निर्यातीचा टक्का हा देशाचा जास्त असेल. स्वतः पिकवत असलेल्या, स्वतः बनवत असलेल्या गोष्टींवरतीच नागरिक आत्मनिर्भर असतील आणि निर्यातीमुळे आर्थिक टक्का हा सर्वोच्च उच्चांक गाठणारा असेल.

आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ देशांतर्गत व्यवसाय वाढवणे इतकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय, कंपन्या, ब्रँड हे जास्तीत जास्त आपल्या देशात आणणे आणि त्यामधून बाहेर पडणारी प्रोडक्स ही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मेड इन इंडिया म्हणून जास्तीत जास्त उपलब्ध करून देणे, ही गोष्ट जागतिक स्तरावर देशाला एक सर्वोच्च आत्मनिर्भरतेच आणि विकसित देशाचं स्थान प्राप्त करून देते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी, इतर देशांमध्ये स्थलांतरित होण्याऐवजी, भारतीय तरुणांनी आंतरराष्ट्रीय ब्रांड हे भारतात आणण्याकडे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी युवकांच्या या प्रयत्नांना सरकारची सुद्धा आर्थिक, राजकीय, सर्वतोपरी मदत मिळणे गरजेचे आहे. तेव्हाच तरुणांनी चालवलेल्या आत्मनिर्भर ते विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. *✒️हर्ष सुरेंद्र नागवेकर*

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!