बातम्या

जे.एस.डब्लू कंपनीला तात्काळ काम बंद करण्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे आदेश.

रत्नागिरी :- केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेला किल्ले जयगड च्या बुरुजांना जे.एस.डब्लू च्या ड्रेजिंग आणि ड्रिलिंग च्या कंपणामुळे तडे गेल्याचे वृत्त सतत काही दिवस सुरू होते. प्रथमथा माहिती अधिकार महासंघ च्या राज्य सचिव आणि दैनिक चालु वार्ता चे प्रतिनिधी समिर शिरवडकर यांनी पाहिल्यादिवसापासून या विषयाचा पाठपुरावा करीत होते.कालच दैनिक चालू वार्ता ने एक वृत्त प्रसिद्ध केले होते,की सरकार माझे अस्तित्व संपले तरी चालले,पण जे.एस.डब्लू चे ड्रेजिंग आणि ड्रिलिंग हे थांबता काम नये.त्याप्रमाणे आज केंद्रीय पुरातत्व विभागने कंपनीच्या व्यवस्थापनेला चालू असलेले काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असून यापुढे कोणतेही अनधिकृत काम करू नये अश्या आशयाचे आदेश F.NO.ASI/VSC/NOC/2023-34 ( FIRST STOP NOTICE) दिले आहेत.प्राचीन वास्तू आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५८ आणि अधिनियम १९५९ नुसार जे.एस. डब्लू कंपणीला आदेशीत केले आहे.
या विषयी दैनिक चालु वार्ता ने आज वर जिल्हाधिकारी कार्यलाय, महसुल विभाग, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ जयगड पोलिस ठाणे,केंद्रीय/राज्य पुरातत्व विभाग,राजकारणी आणि ग्रामस्थांशी नेहमीच पाठपुरावा करीत होते,दैनिक चालू वार्ताच्या पाठपुराव्याला प्रचंड यश आले आहे.परंतु ग्रामस्थांच्या आणि पुरातत्व विभागाच्या नोटीसीला बलाढय आणि राजकिय वरदहस्त असलेले जे.एस. डब्लू याला कितीपत प्रतिसाद देते हे सुद्धा पाहावं लागेल.दरम्यान केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता,ही प्रथम आम्ही त्यांना शो कॉल नोटीस, मग स्टॉप नोटीस,त्यानंतर त्यांच्यवर एफ आय आर दाखल करतो असे दैनिक चालु वार्ता शी बोलताना सांगितले.

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!