बातम्या

भविष्याचा विचार करता रिपाई पक्षाला जिवंत ठेवणे काळाची गरज. प्रा. मुनिश्वर बोरकर.

प्रतिनीधी : विजय शेडमाके.

अध्यक्ष रिपाई. आरमोरी तालुका रिपाईची बैठक थाटामाटात संपन्न.

गडचिरोली _ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारीत निर्माण झालेला रिपब्लिकन पक्ष हाच खरा मुळ पक्ष आहे. बाकी रिपाईतील इतर पक्ष वारसा पसरविण्याचे काम करीत आहेत . आंबेडकरी जनता रिपाईच्या मागे आहे.लोकसभा निवडणुका लक्षात घेता रिपाईचा झंझावती दौरा सुरु झाला असुन चिमुर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात सभा _ बैठका घेण्याचा निर्धार रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , गोपाल रायपूरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले आहेत आहेत. रिपाईला चंद्रपूर- गडचिरोली जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळत आहे.रिपब्लिकन पार्टी आरमोरी तालुक्याची बैठक चंद्रपूर रिपाई जिल्हा अध्यक्ष गोपाल रामपूरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे , सोनू साखरे , कुरखेडा चे मानिक डोंगरे ,टि .एम. खोबागडे आदि लाभले होते. याप्रसंगी गोपाल रायपुरे म्हणाले की जातीयवादी शक्तीला बाजुला सारून जो पक्ष रिपाईला सन्मानाने वागणुक देइल त्या पक्षाला आम्ही सहकार्य करू , आज देशात बेरोजगारी , बेकारी ‘ भाववाढ फोफावत असुन संविधान वाचविण्या साठी जो पक्ष सहकार्य करील त्याच पक्षाला रिपाईची साथ दिल्या जाईल.याप्रसंगी मुरलीधर भानारकर जेष्ठ नेते टि .एम. खोब्रागडे , सोनू साखरे , मानिक डोंगरे , सोनू साखरे ‘ अशोक शामकुळे , पत्रकार सर्व हर्षद साखरे , रुषी सहारे , भुवण बोरकर , चुन्नीलाल मोटघरे ‘ दिनेश बनकर , सत्यवान रामटेके , आदिची समायोचित भाषणे झालीत . कार्यकमाचे संचलन रिपाई सचिव शामराव सहारे प्रास्ताविक आरमोरी तालुका प्रमुख राजेंद्र ठवरे तर आभार प्रशांत मेश्राम यांनी केले. बैठकीला विलास सेलोटे , देवकुमार गेडाम , युवराज धंदरे , राजाराम लोखंडे , अशोक बावणे , नानाजी मेश्राम , प्रकाश बारसागडे , योगेश वानखेडे , चागदेव मेश्राम , वासुदेव लोणारे , देवेंद्र बोदेले , लोकमित्र रामटेके , देवेंद्र मेश्राम , सहीत तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!