बातम्या

गोव्याचे मुख्यमंत्री मा. श्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते प्रभाग क्र. १ परटवणे येथे दीवार लेखन.

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देशभर कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी कमालीची कामाला लागली असून. सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती देखील भारतीय जनता पार्टीने आपला दावा सांगत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्वत्र भित्ती लेखन करून आब की बार मोदी सरकार, इस बार ४०० पार हा नारा दिला जात आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आले असता त्यांच्या हस्ते रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र.१ परटवणे या परिसरात भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष नितीनजी जाधव यांच्या घरी दिवार लेखन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, प्रभागातील कार्यकर्ते, नागरिक, व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!