बातम्या

वसई विरारमधील शेअरिंग रिक्षासाठी होणारी प्रवाशांची लुटमार थांबवा आम्ही वस‌ई विरारकर संस्थेची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी…..

अन्यथा लोकसभा निवडणूकीत जागा दाखवली जाईल : श्री.यशवंत जडयार

विरार :- (प्रमोद तरळ) लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंगचे कारण देत वसई विरार मध्ये रिक्षामध्ये दोन प्रवासी व २० रू. प्रतिसिट असे ठरवण्यात आले,आज लॉकडाऊन संपूण तीन वर्ष झाली तरीही शेरींग रिक्षात चार ते पाच प्रवासी घेऊनही प्रतिसिट २० रू. घेतले जात आहेत,ही वसई विरारकरांची भयंकर आर्थिक लुटमार आहे ती थांबवावी अशी मागणी आम्ही वसई विरारकर या संस्थेच्या वतीने पालघरचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
‌मागील ३ वर्षात आम्ही येथील RTO, जिल्हाधिकारी पालघर, स्थानिक आमदार श्री.हितेंद्र ठाकूर,खासदार श्री.राजेंद्र गावीत यांच्याकडे पाठपुरावा करूनही लुटमार का थांबत नाही? पालघर व वसई विरारमधील ही फसवी शेरींगरिक्षा पद्धत बंद करून मुंबईप्रमाणे येथेही मिटरप्रणाली सुरू करावी अशीही निवेदनात मागणी केली आहे.
यापुर्वी वसई नालासोपारा व विरारमध्ये वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना विरारच्या वतीने दि.२० डिसें.ते २४ डिसे.२०२४ पाच दिवस वसई विरारमध्ये रिक्षावर बहिष्कार टाकून रिक्षा प्रवाशांनी निषेध व्यक्त केला होता,त्याला वसई विरारकरांनी चांगला प्रतिसादही दिला होता.तेव्हा पासून ह्या लुटमारीचा पाठपुरावा सुरू आहे.
‌आज राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे मागील सरकार हे वसुली सरकार होते असे आपण सातत्याने त्यांच्यावर आरोप करत होता मग आज आपण काय करत आहात? दर दिवसाला वसई विरार मध्ये दहा लाख रिक्षाप्रवाशांचे डबल शेअरिंग रिक्षाभाडे घेऊन त्यांची आर्थिक लुटमार केली जात आहे,मग या लुटमारीचा पैसे जातोय कोणाच्या घशात? वसई विरारमध्ये स्थानिक आमदार श्री.हितेंद्र ठाकूर यांच्या सर्व रिक्षा युनियन आहेत,त्यांचा सरकारला पाठींबा आहे, मग तरीही सामान्यांची लूटमार का होतेय? आपण पालघर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून काय करू शकता का? अन्यथा महीनाभरामध्येच लोकसभेची निवडणूक येत आहे,लुटमार करणाऱ्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवली जाईल,असा ईशारा सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति स्थानिक आमदार श्री.हितेंद्र ठाकूर, श्री. क्षितिज ठाकूर,खासदार श्री.राजेद्र गावीत,मुंख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,RTO : वसई विरार व जिल्हाधिकारी पालघर यांनाही पाठवलेल्या असल्याचे सेक्रेटरी श्री. यशवंत जडयार यांनी सांगितले.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!