राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे वाटूळ येथील गौळवाडी ग्रामस्थ मंडळ आणि शिवकॄपा मित्र मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बुधवार दि ३ एप्रिल २०२४ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यातआले होते. या निमित्ताने विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्री ६.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ७ वा. संगीत खुर्ची व इतर स्पर्धा रात्री ८.३० वा. गौळवाडी ग्रामस्थांचे भजन आणि रात्री १० वाजता श्री सिद्धिविनायक नाट्य नमन मंडळ मंदरुळ (गणेश वाडी) यांच्या बहुरंगी नमनाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकॄपा मित्र मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री अशोक धावडे, सेक्रेटरी श्री विलास पेडणेकर, खजिनदार श्री अरुण धावडे व मंडळाचे सर्व सभासद तसेच गौळवाडी ग्रामस्थ मंडळ वाडी प्रमुख श्री सुरेश धावडे तसेच प्रमुख सल्लागार श्री विक्रम धावडे (उपसरपंच) यांचे विशेष सहकार्य लाभले.
- Home
- वाटूळ गौळवाडी (तिवंदामाळ) येथे श्री सत्यनारायण महापूजे निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न…..