बातम्या

लांजा वेरवली बु.येथील श्रीराम प्रतिष्ठान तर्फे भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा.

नाटककार दशरध राणे यांच्या “देवाघरचा न्याय” या नाटकाचा सादर होणार प्रयोग….

लांजा:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे वेरवली बुद्रुक येथील श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने दि. १५,१६, व १७ एप्रिल रोजी श्रीराम मंदिर परिसर, रामवाडी, वेरवली बु येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे
सोमवार दि. १५ एप्रिल रोजी स. ९ वा. श्रीराम मुर्ती वर अभिषेक, सायं ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं ५.३० वा. सामुहिक श्रीराम रक्षा पठण, सायं ७ ते ९.३० पर्यंत आरती, श्री राम पालखी,भोवत्या, मंगळवार दि. १६ रोजी सायं ५.३० वा. सामुहिक श्रीराम रक्षा पठण, सायं ७ ते ९.३० पर्यंत आरती, श्रीराम पालखी, भोवत्या बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी स. ९.३० वा. श्रीराम मुर्तीचे आगमन, श्रीराम जन्माचे किर्तन, किर्तनकार हे.भ.प. श्री चंद्रकांत पवार महाराज वेरवली बु, दु. १२.४० वा. श्रीराम जन्मसोहळा, दु. १ ते १.३० पर्यंत श्रीराम पाळणा (खास आकर्षण ५ वर्षांची मुलगी पाळणा म्हणणार), दु. १.३० ते ३ वा. महाप्रसाद, सायं ४.३० ते ९ वा. पर्यंत श्रीराम पालखी मिरवणूक, रात्रौ १० वा. श्रीराम नाट्य मंडळ वेरवली बु. आयोजित हौशी व कामगार रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार श्री दशरध राणे लिखित व नाना रेडीज दिग्दर्शित “देवा घरचा न्याय” या तीन अंकी नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे या श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाला भक्त गणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री राम प्रतिष्ठान वेरवली बु यांनी केले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!