बातम्या

DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी यांच्या विशेष सहकार्याने जव्हार येथील दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप..

डहाणू :- (प्रमोद तरळ) शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे त्या डोळ्याने प्रत्येक मुलांनी पूर्ण जग बघितले पाहिजे. त्या अनुषंगाने दुर्गम भागातील गरीब गरजू मुले देखील चांगली शिकली पाहिजे आणि त्यासाठी शैक्षणिक शैक्षणिक साहित्यांपासून कोणी वंचित राहू नये . या दृष्टीने त्यांना एक मदतीचा हात पुढे करण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, DVPSS वैतरणा स्टेशन कमिटी, साई पोल्ट्री फार्म (वसई) आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे मित्र एकत्र येऊन भूषण मोरे,दीपक वैती, मुकेश जैन, अजित कीणी, योगेश चौधरी, ठाकूर पाटील, प्रकाश म्हात्रे, महेंद्र भगत, भुपेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गिरिधर टोकरे, भावेश पाटील, विश्वास पाटील यांनी आपल्या यथाशक्ती अशी काढलेली आर्थिक मदत गोळा करत त्या निधीतून आज दि. ०६ जुलै २०२४ रोजी जव्हार येथील डोंगर ‌‌दरी खोऱ्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळा, चोंडीपाडा तसेच जिल्हा परिषद शाळा विनवळ ता.जव्हार येथील २५५ गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या,पेन ,पेन्सिल, खोडरबर , शॉपनर, फूटपट्टी सोबतच खाऊ वाटप करण्यात आला.
या प्रसंगी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री नागदेव पवार, उपाध्यक्ष सतिश धर्मा गावड, साई पोल्ट्री फार्मचे मालक भूपेश पाटील, स्टेशन कमिटी सदस्य योगेश चौधरी, सौ.दामिनी पवार, जव्हार येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मोरघा, चोंदिपाडा शाळेतील शिक्षक भोये सर आणि विनवळ शाळेतील शिक्षक यशवंत गावित, अनिल तम्मलवार, विजय रढे आणि ज्योती जाधव इत्यादी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!