बातम्या

राज युवा संस्थेतर्फे वावे गावातील सिद्धेश उतेकर याला “२०२४ चा युवा आदर्श पुरस्कार” जाहीर झाला.

खेड : (सुदर्शन जाधव)-

खेड तालुक्यातील पंधरागाव विभागातील अगदी डोंगर दरीत वसलेल्या वावे जांभूळ वाडीतील सिद्धेश उतेकर याला राज युवा संस्थे मार्फत पुण्यात 2024 चा युवा आदर्श पुरस्कार जाहीर झाला.मुळात जर पाहायला गेलं तर अगदी मध्यम वर्गीय घरातून आपल्या जीवनाचा प्रवास करणारा सिद्धेश अगदी मेहनती आणि जिद्दी कोणतही कार्य हाती गेलं की त्या साठी लागणारी मेहनत करत स्वतःला त्या मध्ये झोकून देतो.एक उत्तम दर्जाचा शब्दावर चांगली पकड असणारा कवी ज्यांनी अनेक गाणी लिहिली मुंबई रंगमंचावर नाटकातून अनेक भूमिका केल्या वकृत्वाच्या जोरावर एक आपलं अस्तित्व निर्माण केलं गेल्या काही वर्षात समालोचक म्हणून अनेक स्पर्धा देखील पार पडल्या अनेक ठिकाणी आपल्या पंधरा गावाचा झेंडा उचावर रोवला अशा आपल्या त्याच्या कामाची दाखल घेत पुण्यातील राज युवा संस्थेने दाखल घेत पुणे शहरात १७ जुलै रोजी राजयुवा संस्थेचे अध्यक्ष गौरव पुंडे आणि उपाध्यक्ष योगेश हरणे यांच्या हस्ते २०२४ चा युवा आदर्श पुरस्कार देण्यात आला. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!